Advertisement

केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

न्या. एन.एस पाटकर मार्गावरील दक्षिण वाहिनी ही आँपेरा हाऊस व गिरगाव चौपाटीहून हाजीअलीच्या दिशेने उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांना केम्स काँर्नर उड्डाणपूलाहून आता जाता येणार आहे.

केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
SHARES

मुंबईत आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या मलबार हिल परिसरात भूस्खलन झाल्यामुळे डोंगर खचला. या डोंगरावरील ५० ते ६० झाड यावेळी उन्मळून पडली. या डोंगरवरील दरड ही भारतातील सर्वात पहिला केम्स काॅर्नर उड्डाणपरिसरात कोसळल्यामुळे हा उड्डाणपूल काही काळासाठी बंद करण्यात आला होता. अखेर हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी आज पासून वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे.

हेही वाचाः- MPSC परीक्षा पुढे ढकलताना फक्त एकाच जातीचा विचार, बाकीच्याचं काय?- प्रकाश आंबेडकर

मुंबईत आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सलग तीन दिवस पडलेल्या पावसामुळे मुंबई करांची तारांबळ उडाली होती. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. तर बहुतांश ठिकाणी झाडे आणि घर कोसळल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र मलबार हिल परिसरात डोंगर खचून दरड कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. या डोंगराचा सर्व मलबा हा केम्स काँर्नर समोरील रस्त्यावर आला होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळे नागरिकांना वाहने फिरवून पर्यायी मार्गाने जावे लागत होते. या मार्गावरील मलबा हटवण्याचे काम पालिकेकडून युद्ध पातळीवर सुरू होते. त्या ठिकाणी पालिकेने वाळूच्या पोत्यांची पाच फूट भिंत उभारून हा मार्ग एका दिशेने वाहतूकीस खुला केला होता. परंतु केम्स काॅर्नर वरील वाहतूक ही बंद ठेवण्यात आली होती.  

हेही वाचाः- अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...

त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. अखेर या भागातील काम युद्ध पातळीवर संपवून केम्स काॅर्नर हा उड्डाणपूल वाहतूकीसाठी खुला करण्यास पालिकेने हिरवा कंदील दिला. त्यानुसार वातूक पोलिस हा उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करणार आहेत. त्यामुळे न्या. एन.एस पाटकर मार्गावरील दक्षिण वाहिनी ही आॅपेरा हाऊस व गिरगाव चौपाटीहून हाजीअलीच्या दिशेने उत्तरेकडे जाणाऱ्या वाहनांना केम्स काँर्नर उड्डाणपूलाहून आता जाता येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा