Advertisement

अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...

आरे कारशेड मुद्द्यावर सरकारचं अभिनंदन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सरकारची बाजू घेत भाजप नेत्यांना सुनावलं आहे.

अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...
SHARES

आरेतील वादग्रस्त मेट्रो कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय नुकताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. यावरून भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी केवळ अहंकारापोटी घेतलेला हा निर्णय असून यामुळे सरकारचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. मात्र या मुद्द्यावर सरकारचं अभिनंदन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सरकारची बाजू घेत भाजप नेत्यांना सुनावलं आहे. (mns leader amit raj thackeray slams bjp over aarey car shed issue)

मुंबईचं आणि भावी पिढीसाठी गरजेचं असलेल्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान झालेलं परवडेल, असं मत यावर अमित ठाकरे यांनी नोंदवलं आहे. त्याआधी 'आरे' संवर्धनाच्या लढ्यातील आंदोलकांचे तसंच 'आरे' वनजमिनीला जंगल घोषित केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे, महाराष्ट्र सरकारचे अमित ठाकरे यांनी आभार मानले होते.

हेही वाचा - मेट्रो कारशेड हलवल्यामुळे ‘इतका’ खर्च वाया?

मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलाचा-तिथल्या झाडांचा बळी जाऊ नये, यासाठी सातत्याने ज्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, आंदोलनं केली, प्रसंगी तुरूंगवासही भोगला, अशा पर्यावरण संवर्धनाचा आपला मुद्दा सोडला नाही, अशा सर्व पर्यावरणप्रेमींना माझा सलाम! सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा यशस्वी होतो. आरेच्या लढ्याने हेच सिद्ध केलंय. एका अर्थाने हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. आरेबाबत योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांचेही आभार, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

जी मेट्रो रेल्वे पुढच्या वर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली असती, तो प्रकल्प आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत. सरकारने कारशेडच्या कामावर लावलेल्या स्थगितीमुळे १३०० कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. शिवाय कारशेड हलवल्यामुळे ४ हजार कोटींचा वाढीव भार सरकारच्या तिजोरीवर पडल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

दरम्यान, जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना आरे काॅलनीतील वादग्रस्त मेट्रो कारशेड हलवून कांजूरमार्ग येथील शासकीय जमिनीवर नेण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार ११ आॅक्टोबर रोजी केली. आरे कारशेडला माझा विरोध होताच. तशी भूमिकादेखील मी मांडली होती. म्हणूनच आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा