Advertisement

MPSC परीक्षा पुढे ढकलताना फक्त एकाच जातीचा विचार, बाकीच्याचं काय?- प्रकाश आंबेडकर

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलताना सरकारने केवळ एकाच जातीचा विचार केला. उरलेल्या ८५ टक्के विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

MPSC परीक्षा पुढे ढकलताना फक्त एकाच जातीचा विचार, बाकीच्याचं काय?- प्रकाश आंबेडकर
SHARES

राज्य सरकारने मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा (MPSC)ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु ही परीक्षा पुढे ढकलताना सरकारने केवळ एकाच जातीचा विचार केला. उरलेल्या ८५ टक्के विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. (vba chief prakash ambedkar slams maharashtra government over maratha reservation and postponed mpsc exams)

मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत निकाली लागत नाही, तोपर्यंत सरकारने कुठलीही नोकरभरती  करू नये वा त्यासाठी परीक्षा देखील घेऊ नये, अशी मागणी सातत्याने मराठा समाजाकडून करण्यात येत होती. त्यातच राज्य सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आणि पाठोपाठ एमपीएससी परीक्षांची तारीख देखील निश्चित करण्यात आली. यामुळे मराठा समाजातील तरूणांची संधी वाया जाईल, असं म्हणत मराठा समाजाने या परीक्षांना तीव्र विरोध केला तसंच आंदोलनाचाही इशारा दिला. त्यातच संभाजीराजे छत्रपती यांनी गरज पडल्यास तलवार उपसण्याची भाषा केली, तर उदयनराजेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल, तर सर्वांचंच आरक्षण रद्द करा, असं वक्तव्य केलं.

त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा- एक राजा बिनडोक तर दुसरा…, प्रकाश आंबेडकरांचं उदयराजेंवर टीकास्त्र

त्यावर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, एमपीएससी परीक्षांवर निश्चितच तोडगा काढता आला असता. परंतु ही परीक्षा रद्द करताना सरकारने केवळ एकाच जातीचा विचार केला. उर्वरित ८५ टक्के जनतेचं काय? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं. 

महाराष्ट्रात कोणत्याही एका जातीचं राजकारण चालणार नाही. कोणत्या प्रश्नांवर बोलायचं हे आम्ही ठरवितो. राजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांनाच आम्ही राजे मानतो. वंचित बहुजन आघाडीने घेतलेली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूची आहे. पुतळे जाळा, काहीही केलं तरी आम्ही आमची भूमिका व पक्षाची भूमिका बदलणार नाहीत. ही भूमिका  वैचारिक आहे आणि ती कायम राहील, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

राज्य सरकारच्या कामकाजावर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार अतिरेक करत आहे. केंद्र सरकारच्या दिशानिर्देशाची अंमलबजावणी न करता हे सरकार सातत्याने केंद्रविरोधी भूमिका घेत आहे. कृषी विधयेक आणि मंदिर उघडण्यासारखे केंद्राचे निर्णय राज्य सरकारने धुडकावले आहेत. वारकरी संप्रदायाने सरकारविरोधात आंदोलन केल्यामुळे महाराष्ट्रमध्ये मंदिरे उघडी केली जात नाही. त्यामुळे हे सरकार निष्फळ ठरलं आहे, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर केली. 

हेही वाचा- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा