Advertisement

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या

MPSC परीक्षांसदर्भात ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सेवा मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या
SHARES

MPSC परीक्षांसदर्भात ठाकरे सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सेवा मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली.

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटेंनी विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारवर टीका झाली.

पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे MPSC परीक्षा येत्या ११ आॅक्टोबरला होणार होती. मात्र सध्या राज्यात कोरोनाचा धोका आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आल्यानं ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

छत्रपती उदयन राजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण आणि एमपीएससीबद्दल सोशल मीडियातून पोस्ट केली होती. मराठा समाजाचा अंत पाहू नका, असं म्हणत उदयन राजे यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

“येत्या ११ तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचं न भरून येणारं मोठं नुकसान होणार आहे. तरीही सरकारनं ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर लगेच १५ हजार जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का झाली आहे? आरक्षणाच्या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड मोठी चिड निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे,” अशी टीका उदयनराजेंनी केली होती.



हेही वाचा

आयडॉलच्या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांच्या प्रचंड तक्रारी

पालकांचं शोषण करणाऱ्या शाळांविरोधात मनसेचा पुढाकार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा