Advertisement

आयडॉलच्या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांच्या प्रचंड तक्रारी

आयडॉलच्या हेल्पलाइनवर न मिळालेल्या मदतीचा जास्त मानसिक त्रास झाल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत.

आयडॉलच्या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांच्या प्रचंड तक्रारी
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा (online exam) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅकनं (cyber attack) तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानं ६ व ७ ऑक्टोबर रोजी होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. या तांत्रिक अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्याशिवाय, आयडॉलच्या हेल्पलाइनवर न मिळालेल्या मदतीचा जास्त मानसिक त्रास झाल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत.

आयडॉलच्या (idol) दोन्ही हेल्पलाइनवर ३ तारखेपासून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रतिसाद देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आयडॉलच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठानं ९६१९४८६२६५, ९६१९५३६८२९ आणि ९६१९७१३३४८ या ३ संपर्क क्रमांकांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रकारच्या तक्रारींचं निवारण केलं जातं तर, परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणींसाठी दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील (आयडॉल) व विद्यापीठ विभागातील विद्यार्थ्यांनी ०८०-४७१९१११६ या क्रमांकावर संपर्क साधावा असं विद्यापीठ प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ज्या खासगी कंपनीला कंत्राट दिलं त्यांच्या हेल्पलाइनवरून विद्यार्थ्यांना मंगळवारी कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी त्यांनी विद्यापीठाकडं केल्या. विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांकावरही अनेक तक्रारी येत असल्यानं ३ हेल्पलाइनवर सर्वच तक्रारींचं उत्तर देणं शक्य झालं नसल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा