Advertisement

एक राजा बिनडोक तर दुसरा…, प्रकाश आंबेडकरांचं उदयराजेंवर टीकास्त्र

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला वंचितचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.

एक राजा बिनडोक तर दुसरा…, प्रकाश आंबेडकरांचं उदयराजेंवर टीकास्त्र
SHARES

मराठा आरक्षणावर छत्रपती संभाजी राजे यांनी भूमिका घेतलेली असली, तरी ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच अधिक भर देताना दिसत आहेत. तर एक राजा बिनडोक असून त्याला भाजपने राज्यसभेवर कसं पाठवलं? असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजेंवर टीकास्त्र सोडलं. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला वंचितचा पाठिंबा असल्याचं देखील जाहीर केलं. (VBA chief prakash ambedkar support maharashtra bandh for maratha reservation issue)

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे या दोघांनी नेतृत्व करावं, अशी मागणी होत आहे. या प्रश्नावर भूमिका मांडताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, दोन्ही राजांचा मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा आहे, असं माझ्या वाचनात आलेलं नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजीराजे यांनी आरक्षणाबद्दल भूमिका घेतली असली, तरी ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिक भर देत आहेत. आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सर्वांचं आरक्षण रद्द करा, अशी जे भूमिका मांडतात, ज्यांना राज्यघटना माहीत नाही, अशा व्यक्तीला भाजपानं राज्यसभेवर कसं पाठवले? असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे यांचं नाव न घेताच त्यांच्यावर निशाणा साधला.  

हेही वाचा- मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारचे ८ मोठे निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूरमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत १५ ठराव करण्यात आले. हे ठराव मान्य करण्यासाठी राज्य सरकारला ९ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १० आॅक्टोबरला महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा सरकारला देण्यात आला आहे.  

यासंदर्भात मराठा आरक्षण समितीतील प्रतिनिधी सुरेश पाटील यांनी फोन करून १० आॅक्टोबरच्या बंदला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यात आला आहे, अशी माहिती देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 

हेही वाचा- सरकारने नीट बाजू न मांडल्यामुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती- रावसाहेब दानवे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा