Advertisement

One nation one card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात

या योजनेमुळं प्रवासात तिकीट किंवा पास काढण्यासाठी लागणाऱ्या रोख रकमेचा व्यवहार टाळण्यास मदत होणार आहे.

One nation one card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. 'वन नेशन, वन कार्ड' (one nation one card) म्हणजेच 'एक राष्ट्र, एक कार्ड' ही योजनेला प्रायोगिक तत्त्वावर बेस्ट उपक्रमात सुरुवात झाली असून, त्याच्या तांत्रिक चाचण्याही सुरू आहेत. या योजनेमुळं प्रवासात तिकीट किंवा पास काढण्यासाठी लागणाऱ्या रोख रकमेचा व्यवहार टाळण्यास मदत होणार आहे.

'वन नेशन, वन कार्ड' या योजनेनुसार हे कार्ड रेल्वे, मेट्रो-मोनोसाठीही वापरता येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात 'वन नेशन, वन कार्ड'साठी लागणाऱ्या हार्डवेअरच्या चाचणीला कुलाबा (colaba bus depot) आणि वडाळा (wadala bus depot) आगारात सुरुवात केल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं (best bus) दिली. ही चाचणी झाल्यानंतर प्रत्यक्षात बसमध्येही त्याची चाचणी केली जाणार आहे. यासाठी बेस्टच्या ५ ते १० कर्मचाऱ्यांना कार्ड (card) देऊन प्रयोग केला जाणार आहे.

प्रवासात हे कार्ड बेस्ट वाहकाला दाखवलं जाईल आणि त्याच्याकडील यंत्राद्वारे हे कार्ड वैध आहे का ते पाहून प्रवासाचं तिकीट देण्यात येईल. या कार्डमधूनच प्रवाशाच्या तिकिटाचे पैसे अदा केले जाणार आहेत. त्यासाठी कार्ड रिचार्ज करणे आणि त्यात पैसे असणे गरजेचं आहे. यामध्ये नेमक्या काही तांत्रिक समस्या येतात का ते पाहिले जाईल आणि त्यानंतरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

'वन नेशन, वन कार्ड' हे रेल्वे, मेट्रो, मोनोसाठीही वापरता येणार आहे. त्यामुळे प्रवास झटपट व रोख रकमेशिवाय करणे शक्य होईल. कार्ड रिचार्जची रक्कम १०० रुपयांपासूून पुढे असावी यासाठी प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. सध्या लॉकडाऊन असल्यामुळं या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली. लोकल, मेट्रो, मोनो सुरू झाल्यानंतर त्यांच्याशीही चर्चा करून प्रयोगाचा विस्तार वाढण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबईबरोबरच देशभरातील अन्य परिवहन सेवांसाठीही हे कार्ड वापरता येणार आहे. सध्या बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेस्टने स्मार्ट कार्ड उपलब्ध केलेले आहे. हे कार्ड बेस्ट पुरताच मर्यादित आहे. परंतु वन नेशन वन कार्ड हे संपूर्ण सार्वजनिक वाहतुकीसाठी (public transport) वापरता येणार आहे.



हेही वाचा -

रेल्वे भरतीसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर

अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा