Advertisement

रेल्वे भरतीसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर

रेल्वे भरतीसाठी पहिल्या टप्प्यातील परिक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये एकूण १ लाख ४० हजार ६४० विविध पदं भरली जाणार आहेत.

रेल्वे भरतीसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर
SHARES

रेल्वे भरतीसाठी पहिल्या टप्प्यातील परिक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये एकूण १ लाख ४० हजार ६४० विविध पदं भरली जाणार आहेत. यासाठीची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यानुसार पहिल्या टप्प्यातील परीक्षा १५ डिसेंबरला होणार आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी १५ डिसेंबर २०२० ला  परीक्षा होणार असल्याचं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाने तयारीही सुरु केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. 

भारतीय रेल्वेतील मेगाभरतीसाठी याआधी रेल्वे मंत्रालयाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत. परीक्षेसाठी एकूण २ कोटी ४० लाख अर्ज आले आहेत. त्यांची छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या सर्व जागा विविध श्रेणीच्या पदांसाठी आहेत. कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाला उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट लांबणीवर टाकावी लागली होती.



हेही वाचा -

केम्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

One Nation One Card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा