मुंबईत येत्या २ वर्षांत २० नवे मॉल्स

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील रहिवाशांना लवकरच नव-नवीन मॉल्समध्ये जाऊन खरेदी करता येणार आहे. कारण येत्या २ वर्षात मुंबईत २०, तर २०२५ पर्यंत आणखी १० मॉल्स उभारले जाणार आहेत. मुंबईतील वांद्रे, बोरिवली, ओशिवरा, वरळी, अंधेरी, शिवडी यांसह विरार, वसई, घणसोली, भिवंडी, मीरा रोड, जुईनगर इथं सध्या बांधकाम सुरू असलेल्या मॉलपैकी ७ मॉल्स येत्या वर्षांच्या अखेरीस कार्यान्वित होणार आहेत. उर्वरित अनुक्रमे ७ व ६ मॉल २०२१ आणि २२ पर्यंत पूर्ण होणार आहे.

सध्या मुंबईत मालाड व वर्सोवा येथील इन्फिनिटी, तसंच गोरेगाव येथील इनऑर्बिट, ओबेरॉय आणि लोअर परळ येथील हायस्ट्रीट फिनिक्स हे ठरावीकच मॉल सध्या गर्दी खेचत असताना ठाण्यातील तसंच, मुंबईतील काही मॉल बंद पडले आहेत. ओशिवरातील मेगा मॉल ओस पडला होता. परंतु, तो पुन्हा सुरू करताना त्याचं क्षेत्रफळ आता ३ लाख चौरस फूट इतकं वाढविण्यात येणार आहे.

कांदिवली इथं शापुरजी, तर बोरिवली इथं रुणवाल समुहामार्फत येत्या ३-४ वर्षांत १० लाख चौरस फूट आकाराचा मॉल उभारण्यात येणार आहे. परवडणारी घरं आणि एकूणच रखडलेलं गृहप्रकल्प पूर्ण करण्यावर विकासकांनी भर दिला आहे. त्यामुळं येत्या २-३ वर्षांत निवासी घरांची संख्या वाढणार आहे. ही गरज लक्षात घेऊन विकासकांनी मुंबईसह परिसरातही मॉल उभारण्याचं ठरविल्याची माहिती मिळते.

२०२३ ते २५ या वर्षांत होणारे मॉल

  • इनऑर्बिट, के. रहेजा, घणसोली (१ लाख)
  • व्हीआर मॉल, व्हर्च्युअल रिटेल, ठाणे (२ लाख ४० हजार)
  • रुनवाल, बोरिवली (१० लाख)
  • एस. डी. कॉर्पोरेशन, शापूरजी, कांदिवली (१० लाख)

२०२० ते २२ अखेपर्यंत तयार होणारे मॉल्स

  • रिलायन्स मॉल, वांद्रे-कुर्ला संकुल(३ लाख)
  • मेकर्स मॉल्स, वांद्रे (५ लाख)
  • लेकशोअर, स्वस्तिक बिल्डर्स, वसई (३ लाख)
  • ओबेरॉय मॉल, बोरिवली (६.५ लाख)
  • डायस मॉल, होमेज डेव्हलपर्स (१ लाख)
  • ध्रुमील शाह, विरार (१ लाख)
  • मेगा मॉल, दूधवाला बिल्डर्स, ओशिवरा (३ लाख)
  • ओबेरॉय मॉल, वरळी (४ लाख)
  • टीआरआयएल, टाटा, घणसोली (७.५ लाख)
  • रहेजा युनिव्हर्सल, रहेजा, जुईनगर (१० लाख)
  • जेपी इन्फ्रा, मीरा रोड (सव्वा दोन लाख)
  • रुनवाल, अंधेरी पूर्व (२ लाख)
  • अशोक डेव्हलपर्स, भिवंडी (२ लाख)
  • बे बोलवर्ड मॉल, एनडीडब्ल्यू ग्रुप, शिवडी (६ लाख)
  • सनटेक, जोगेश्वरी (५ लाख)
  • रेडिअस, जुहू (४ लाख)
  • रईस-किरण, अंधेरी पश्चिम (५ लाख)
  • मॅट्रिक्स मॉल, जेमनी डेव्हलपर्स, सायन बस डेपो (५ लाख)
  • रुनवाल, डोंबिवली (६ लाख)
  • देवनार, कुकरेजा, चेंबूर (४.५ लाख) (क्षेत्रफळ चौरस फुटांमध्ये)


हेही वाचा -

ठाणे-दिवा ५ व ६व्या मार्गासाठी १० तासांचे १२ मेगाब्लॉक

लोकप्रतिनिधींच्या दारी बेस्ट कर्मचारी; मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं अनोख आंदोलन


पुढील बातमी
इतर बातम्या