Advertisement

ठाणे-दिवा ५ व ६व्या मार्गासाठी १० तासांचे १२ मेगाब्लॉक

ठाणे-दिवा ५ व ६व्या मार्गासाठी रुळांच्या (Track) तांत्रिक कामांसाठी प्रत्येकी १० तासांचे १२ मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहेत.

ठाणे-दिवा ५ व ६व्या मार्गासाठी १० तासांचे १२ मेगाब्लॉक
SHARES

ठाणे ते दिवा (Thane to Diva) पाचवी व सहावी मार्गिका ही मध्य रेल्वेच्या (Central Railway) दृष्टीनं महत्वाची मार्गिका आहे. मागील अनेक वर्षांपासून या मार्गिकेचं काम रखडलं आहे. त्यामुळं मध्य रेल्वे प्रशासनानं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, आता मार्गिकेचं काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वेकडून १० तासांचे १२ मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहेत. ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाचं काम एप्रिल २०२० नंतर अंतिम टप्प्यात येणार आहे. 

या मार्गातील रुळांच्या (Track) तांत्रिक कामांसाठी प्रत्येकी १० तासांचे १२ मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहेत. एप्रिलनंतर टप्प्याटप्यात हे ब्लॉक घेऊन रुळांची कामं त्वरित उरकण्यावर भर असल्याची माहिती 'एमआरव्हीसी'नं (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) दिली.

मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करण्यासाठी मध्य रेल्वेवर (Central Railway) 'एमआरव्हीसी'मार्फत (MRVC) पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येत आहे. त्यामुळं लोकल (Local) गाड्यांसाठी प्रवास सुकर होणार आहे. आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ल्यापर्यंत पाच आणि सहाव्या मार्गाचं काम पूर्ण झालं आहे.

गेल्या दहा वर्षांत ठाणे ते दिवा पाच आणि सहाव्या मार्गाच्या कामाला अनेक वेळा अंतिम मुदत देण्यात आली. मार्च २०१९ ही अंतिम मुदत असतानाही त्यात बदल झाला आणि डिसेंबर २०२० किंवा मार्च २०२१ पर्यंत मार्गिका पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. मुंब्राजवळही दीड किलोमीटरचा उन्नत मार्ग व अन्य कामं सुरू आहेत. उन्नत मार्गासाठी गर्डर राज्याबाहेरून आणले जाणार असून, त्याच्याही कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

या मार्गिकेदरम्यान रुळांची 'कट-कनेक्शन' अशी मोठी तांत्रिक कामं करावी लागणार आहेत. यात नवीन मार्गातील रुळ हे जुन्या मार्गातील रुळांना जोडण्यात येतात. अशी नऊ ‘कट-कनेक्शन’ असून त्यासाठी मोठे मेगाब्लॉक घ्यावे लागणार असल्याचं समजतं. यासाठी प्रत्येकी १० तासांचे १२ मेगाब्लॉक घेण्याचंं नियोजन करण्यात आलं आहे.

एप्रिलनंतर हे ब्लॉक टप्प्याटप्यात रविवारीच घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यानंतर मात्र, पुन्हा ब्लॉक घेऊन काम केलं जाणार आहे. त्यामुळं या कामांचा काही प्रमाणात प्रवाशांना फटका बसण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.



हेही वाचा -

मुलांनो TikTok वर होताय 'आऊट ऑफ कंट्रोल', आता पालक करणार कंट्रोल

अनन्या पांडेची साऊथ चित्रपटात एन्ट्री, अर्जुन रेड्डी फेम हिरोसोबत झळकणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा