Advertisement

मुलांनो TikTok वर होताय 'आऊट ऑफ कंट्रोल', आता पालक करणार कंट्रोल

आता TikTok वर पालकांचं नियंत्रण, सेफ्टी फिचर लाँच... मुलांच्या टिकटॉक व्हिडिओवर पालक लक्ष ठेवू शकतील. पण कसं हे वाचा...

मुलांनो TikTok वर होताय 'आऊट ऑफ कंट्रोल', आता पालक करणार कंट्रोल
SHARES

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अॅप Tik Tokची सध्या प्रचंड क्रेझ आहे. फक्त तरुणाईचं नाही तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच Tik Tok नं वेड लावलं आहे. सामान्यांसोबतच सेलिब्रेटींनाही Tik Tok ची चांगलीच भूरळ पडली आहे. मात्र लहान मुलांकडून अॅपचा वाढता वापर बघता त्यावर पालकांचे नियंत्रण असणं गरजेचं आहे.


'फॅमेली सेफ्टी मोड ऑन

हीच बाब लक्षात घेत टिकटॉकनं नवे सेफ्टी फिचर लाँच केलं आहे. 'फॅमेली सेफ्टी मोड' (Family Safety Mode) असं या फिचरचं नाव आहे. यामुळे मुलांच्या टिकटॉक व्हिडिओवर पालक लक्ष ठेवू शकतील. या फिचरमुळे पालकांना मुलांचं अकाऊंट आपल्या अकाऊंटसोबत लिंक करता येईल.

 पालकांचा कंट्रोल

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, टिकटॉकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्यानं युजर्संना अॅप सुरक्षित वाटावे यासाठी नवनवे फिचर्स सादर केले जात आहेत. Family Safety Mode या नव्या फिचरमुळे पालकांना आपल्या मुलाचे TikTok अकाऊंट कंट्रोल करता येईल आणि त्यावर लक्षही ठेवता येईल. तसंच युजर्स टिकटॉकव किती वेळ अॅपवर घालवातात याचीही माहिती त्यांना मिळणार आहे. यासाठी screen time management सोबत सेफ्टी व्हिडिओजची मालिका काढण्याचा प्रयत्न केला जात आहे

लवकरच भारतात लाँच

सर्व प्रथम Family Safety Mode हे नवं फिचर UK मध्ये लाँच केलं जाईल. त्यानंतर इतर देशातील युजर्संना याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.



हेही वाचा

कॅब चुकीच्या मार्गानं घेऊन जात असेल तर Google देणार वॉर्निं

सांभाळून करा सोशल मीडियावर पोस्ट, सरकारची तुमच्या फेसबुक, ट्विटरवर नजर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा