मुंबई विद्यापीठाची नवीन लायब्ररी 'या' तारखेला उघडणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केली की मुंबई विद्यापीठ अखेर १५ मार्चपासून नवीन ग्रंथालय इमारतीचा वापर सुरू करणार आहे. ग्रंथालयाची दुरवस्था आणि पुस्तके आणि शोधनिबंध सडल्यामुळे हे वाचनालय चर्चेत आले आहे.

कलिना कॅम्पसच्या अपूर्ण असलेल्या विविध विकास आराखड्याच्या कामांची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी बुधवारी, २ मार्च रोजी विद्यापीठ आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सामंत यांनी एमएमआरडीएच्या सहकार्याने विद्यापीठाचा विकास आराखडा प्राधान्यानं पूर्ण करण्याबाबतही सांगितले.

शिवाय, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि मुलींसाठी आणखी एक वसतिगृह उभारण्यासह प्रकल्पांवर जलद हालचाली सुनिश्चित करण्यासाठी पालिकेकडून नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना, विशेषत: सुरक्षा आणि स्वच्छता विभागातील ज्यांना सध्या तुटपुंजे वेतन दिले जाते, त्यांना किमान वेतन देण्यास सुरुवात करावी, अशा सूचनाही त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, गेल्या आठवड्यात, उदय सामंत यांनी कालिना कॅम्पसमधील एमयूच्या जवाहरलाल नेहरू लायब्ररीला भेट दिली होती.

नवीन इमारत तयार असूनही तिच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नव्हती. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची विनंती ते महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे करणार आहेत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. या बैठकीत स्थलांतराचे काम सुरू करण्याच्या आराखड्याला अंतिम रूप देण्याची अपेक्षा आहे.

सामंत म्हणाले की, ही विद्यापीठाची जबाबदारी असताना महाराष्ट्र सरकारनं या समस्येसाठी पुढाकार घेतला आहे. म्हणून त्यांनी ग्रंथालयाला भेट दिली. त्यांच्या मते आता वाचनालयाला मूळ वैभवात आणण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.

याशिवाय ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या नावानं मुंबईत आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा

मुंबई विद्यापीठातील 'या' विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन

जेईई-मेन आणि बोर्डाच्या परीक्षा क्लॅश; तारखा पुढे ढकलण्याची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या