Advertisement

मुंबई विद्यापीठातील 'या' विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन

विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांच्या कालावधीनंतरची ही पहिली ऑफलाइन परीक्षा असेल.

मुंबई विद्यापीठातील 'या' विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन
(Representational Image)
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या अभियांत्रिकी, कायदा, फार्मसी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांच्या कालावधीनंतरची पहिली ऑफलाइन परीक्षा असणार्‍या या परीक्षांमध्ये वर्णनात्मक आणि बहु-निवडक प्रश्नांचा समावेश असेल.

तथापि, सर्व पारंपारिक पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षांबाबत निर्णय घेणे बाकी आहे.

यावेळी, विद्यापीठानं सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, एकसमान वेळापत्रक आणि प्रश्नपत्रिका विद्यापीठाद्वारे प्रदान केल्या जातील. या अभ्यासक्रमांसाठी ६० गुण वर्णनात्मक प्रश्नांसाठी असतील. तर २० गुण MCQ साठी असतील.

असं नोंदवलं गेलं आहे की, कायद्याच्या परीक्षा ऑफलाइन देखील घेतल्या जातील. जिथं ३० गुण वर्णनात्मक प्रश्नांसाठी आणि ३० गुण MCQ साठी असतील. बीएडसाठी, सेमिस्टर १ आणि ३ (बॅकलॉग) ऑनलाइन असतील, तर सेमिस्टर २ आणि ४ ऑफलाइन असतील.

दुसरीकडे, प्रात्यक्षिक परीक्षा २१ मार्चपासून ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीनं सुरू होतील. स्थानिक जिल्हा प्रशासनाशी सल्लामसलत केल्यानंतर कॉलेज स्तरावर ऑफलाइन परीक्षा घेण्यात येतील.

त्याचप्रमाणे, वर्णनात्मक स्वरूपाचे पेपर पुनर्मूल्यांकनासाठी दिले जाऊ शकतात, जे MCQ स्वरूपात देऊ शकत नाहीत. तांत्रिक कारणांमुळे जे ऑनलाइन परीक्षेला मुकले त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल. महाविद्यालयांना विद्यार्थ्याला परीक्षेची पद्धत आणि स्वरूपाची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.



हेही वाचा

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

१२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या परीक्षा कधी होणार?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा