Advertisement

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती.

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार
SHARES

सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या (Class X and Class XII exam) विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे.

सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांनी ही याचिका फेटाळली आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता, असं निरिक्षण देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. त्यामुळं यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना आता आगामी काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोरं जावं लागणार आहे.

दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द कराव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिका या विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या आशा निर्माण करतात. न्यायालयांनी अशा प्रकारच्या याचिकांची दखल घेतल्यास यंत्रणांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या कशा प्रकारच्या याचिका आहेत, असा सवाल देखील सुप्रीम कोर्टानं विचारला आहे. संबंधित यंत्रणांना निर्णय घेऊ द्या, असं मत देखील सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्रात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर ५ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत होतील.



हेही वाचा

२३, २४ फेब्रुवारीला १७ लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप

पहिल्याच टर्ममध्ये MPSC पास , राज्यतून ४था क्रमांक पटकावला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा