Advertisement

पहिल्याच टर्ममध्ये MPSC पास , राज्यतून ४था क्रमांक पटकावला

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०१९ मध्ये संजयनं राज्यभरातून ४था क्रमांक पटकावला आहे.

पहिल्याच टर्ममध्ये MPSC पास , राज्यतून ४था क्रमांक पटकावला
SHARES

इच्छाशक्तीच्या बळावर अशक्य असं काहीच नाही, ही म्हण मुंबईतल्या एका २६ वर्षीय तरूणानं खरी करून दाखवली आहे. संजय राजेंद्र यादव असं या तरूणाचं नाव आहे. संजयनं पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

संजयनं कन्स्ट्रक्शन मॅनेजरचे शिक्षण पूर्ण केले असून तो अध्यापनाची नोकरी करत आहे. नोकरीसोबतच त्यानं अभ्यासासाठी देखील स्वत:ला झोकून दिलं.

मेहनतीच्याच जोरावर त्यानं पहिल्यांदाच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०१९ मध्ये संजयनं राज्यभरातून ४था क्रमांक पटकावला आहे.

१७ ते १८ तास अभ्यास करायचा

एमपीएससी क्लिअर करणे हे संजयचे दीर्घकाळचे स्वप्न होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनं रात्रंदिवस एक केले. संजय दिवसातून सुमारे १७ ते १८ तास अभ्यास करायचा. अध्यापनाच्या कामासोबतच अभ्यास सांभाळणे हे खूप आव्हानात्मक काम होते.

संजय सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अभ्यास करायचा. या दरम्यान तो फक्त जेवण आणि झोपण्यासाठी वेळ काढायचा.

मालाडच्या पठाणवाडी परिसरात राहणाऱ्या संजयनं २०१९ मध्ये बांधकाम व्यवस्थापनाचा अभ्यास पूर्ण केला. मात्र, अभ्यासासोबतच त्यानं काही वर्षांपूर्वी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. संजय मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. संजयचे वडील पेशानं वकील आहेत. वडिल वकील असल्यानं संजयच्या घरात सुरुवातीपासूनच शिक्षणाचे वातावरण होते.



हेही वाचा

१०वी, १२वीच्या परीक्षांदरम्यान शिक्षकांची त्यांच्याच विद्यार्थ्यांवर नजर

खासगी शाळांमधील २५% आरक्षित जागांवर मोफत प्रवेश सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा