Advertisement

१०वी, १२वीच्या परीक्षांदरम्यान शिक्षकांची त्यांच्याच विद्यार्थ्यांवर नजर

राज्य सरकारनं सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी अधिकृत अधिसूचना काढली.

१०वी, १२वीच्या परीक्षांदरम्यान शिक्षकांची त्यांच्याच विद्यार्थ्यांवर नजर
(Representational Image)
SHARES

एसएससी आणि एचएससी विद्यार्थ्यांना त्यांच्याच घराजवळ म्हणजेच स्वत:च्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे देण्यात येणार आहेत. यासोबतच त्यांचेच शिक्षक स्वतःच्या विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवतील.

विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या जवळील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केंद्रे दिली जातील. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होणार आहेत. त्याचबरोबर दहावीच्या परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होणार आहेत.

मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर काही भागांमध्ये ऑफलाइन परीक्षा आयोजित करण्यावरून झालेल्या वादानंतर, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बोर्डाच्या परीक्षांसाठी काही विशेष उपाययोजना जाहीर केल्या होत्या. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील शाळा किंवा महाविद्यालयात परीक्षा लिहिता येतील.

याव्यतिरिक्त, राज्य सरकारनं सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी अधिकृत अधिसूचनेमध्ये सांगितलं की, लसीकरण नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल. तथापि, शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करावं असं सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

सीबीएसई बोर्ड दहावी, बारावी दुसऱ्या टर्मची परीक्षा ऑफलाईन

स्कूल बसच्या भाडे शुल्कात होणार ३० टक्क्यांनी वाढ; १० फेब्रुवारीपासून होणार सेवा सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा