सलग दुसऱ्या वर्षी नवी मुंबई ठरलं 'कचरामुक्त शहर'

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दरवर्षी प्रमाणं यंदाही सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यात आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात आला असून, यामध्ये मुंबईला शून्य रेटिंग मिळाली आहे. तर सलग दुसऱ्या वर्षी नवी मुंबईला 'कचरामुक्त शहर' म्हणून 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. या श्रेणीत 7 स्टार पर्यंत रेटिंग मिळते. दरम्यान, रेटींग अहवाल जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाल यांनी आनंद व्यक्त करत 'आम्ही 7 स्टार रेटिंग प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत', असं म्हटलं.

राष्ट्रीय स्तरावर चालविण्यात येणाऱ्या 'स्वच्छ भारत अभियाना' अंतर्गत देशातील कचरामुक्त शहरांना मंगळवारी स्टार रेटिंग देण्यात आले. केंद्रीय नगरविकास मंत्रालयातर्फे हरदीपसिंग पुरी यांनी याबाबत घोषणा केली. नवी मुंबई व्यतिरिक्त, मध्य प्रदेशातील इंदूर, कर्नाटकातील म्हैसूर, गुजरातमधील सूरत आणि राजकोट आणि छत्तीसगडमधील अंबिकापूर या शहरांनाही स्टार रेटिंग देण्यात आले आहेत.

नवी मुंबईने 5 स्टार रेटिंग मिळवून राज्याचा अभिमान वाढविला आहे. हे रेटिंग प्राप्त करणारी नवी मुंबई ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका आहे. स्वच्छता सर्वेक्षण - २०१९ मध्ये नवी मुंबईला देशातील ७वं स्वच्छ शहर म्हणून स्थान देण्यात आलं आहे.


हेही वाचा -

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या