नवी मुंबई विमानतळापर्यंत सुरू होणार बस सेवा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport - NMIA) उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर, विमानतळ प्राधिकरणासह नवी मुंबई महापालिकेने(NMMC) या मार्गावर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या परिवहन सेवेने (NMMT) विमानतळाला जोडण्यासाठी 150 नवीन सीएनजी बस खरेदी करण्याची निविदा (Tender) प्रसिद्ध केली आहे.

नवी मुंबई विमानतळापासून नवी मुंबई महापालिकेची हद्द काही मिनिटावर आहे. त्यामुळे विमानतळ सुरू होताच विमानतळ ते रेल्वेस्थानकांशी जोडण्यासाठी पालिका परिवहन उपक्रम तयारी करत आहे.

पहिल्या टप्प्यात २० बसेस

पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांसाठी पहिल्या टप्प्यात 20 बसेसचे परिचालन तातडीने सुरू करण्याची तयारी एनएमएमटीने ठेवली आहे.

नवी मुंबई विमानतळ हे भौगोलिकदृष्ट्या पनवेल महापालिकेच्या (PMC) हद्दीत असले तरी, ते नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीला लागून आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रवाशांना विमानतळापर्यंत जलद सेवा पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी एनएमएमटीने स्वीकारली आहे.

ताफ्यात होणार मोठी वाढ

सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात जवळजवळ 350 गाड्या सेवेत आहेत. या ताफ्यात नव्याने 150 सीएनजी बस दाखल झाल्यानंतर परिवहन उपक्रमाची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. बस खरेदीचा प्रस्ताव प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे वाढत्या प्रवासी संख्येला हाताळणे शक्य होईल.

रेल्वे स्थानकांशी जोडणी

विमानतळापासून नवी मुंबई महापालिकेची हद्द काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे पालिका परिवहन उपक्रम विमानतळाला रेल्वे स्थानकांशी जोडण्यासाठी तयारी करत आहे.

विमानतळापासून लगतच असलेल्या रेल्वे मार्गांबरोबरच हार्बर रेल्वेपर्यंतच्या (Harbour Railway) सेवा सुरू करण्याबाबतची पूर्वतयारी एनएमएमटीने सुरू केली आहे.


हेही वाचा

मुंबईत ट्रॅफिक सिग्नल्सवर बीपर्स बसवणार

बोरिवली-ठाणे भुयारी मार्गासाठी ग्रंथालयावर हातोडा?

पुढील बातमी
इतर बातम्या