रविवारी मुंबईत ७९४ नवे रुग्ण; २० कोरोनाबधितांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत रविवारी ७९४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. तर एका दिवसात ८३३ रुग्ण कोरोनामुक्त (coronavirus) झाले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी ५२७ दिवसांपर्यंत वाढला आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली स्थिरावली आहे.

रविवारी ७९४ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ७ लाख ११ हजारापुढे गेली आहे. एका दिवसात ८३३ रुग्ण बरे झाल्यामुळं आतापर्यंत ६ लाख ७८ हजाराहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या १६ हजार ७० उपचाराधीन रुग्ण आहेत.

शनिवारी २६ हजार ७५८ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४ टक्क्यांपेक्षा कमी नागरिक बाधित आढळले आहेत. आतापर्यंत ६४ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्णवाढीचा दर  ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ५२७ दिवसांवर पोहोचला आहे. रविवारी २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.


हेही वाचा - 

महाराष्ट्रात ७ जूनपासून अनलॉक, ५ टप्प्यात लॉकडाऊन हटवणार

महाराष्ट्र अनलॉक : सोमवारपासून काय सुरु, काय बंद?


पुढील बातमी
इतर बातम्या