Advertisement

महाराष्ट्र अनलॉक : सोमवारपासून काय सुरु, काय बंद?

महाराष्ट्रात ५ टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र अनलॉक : सोमवारपासून काय सुरु, काय बंद?
SHARES

महाराष्ट्रात ५ टप्प्यात अनलॉक (maharashtra unlock) करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या ७ जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. या १८ जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यात ५० टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचं म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबईत लॉकडाऊन शिथील होणार नाही.

अनलॉकचे टप्पे

  • पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे
  • दुसर्‍या टप्प्यात ५ जिल्हे
  • तिसरा १० जिल्हे
  • चौथ्या टप्प्यात २ जिल्हे

पहिल्या टप्प्यात काय सुरु राहणार?

रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये १०० टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना १०० टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस १०० टक्के क्षमतेने  सुरु होतील. इतर राज्यातून येणाऱ्यांवर काही निर्बंध असतील. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. पहिल्या लेव्हलमध्ये हे सगळं सुरू असणार आहे.

पहिल्या लेवलमधील जिल्हे –  औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे , वर्धा, वाशिम, यवतमाळ

लेव्हल २ मध्ये काय सुरु असणार?

लेव्हल २ मध्ये ५० टक्के क्षमतेने हॉटेल सुरु असतील. मॉल चित्रपट गृह ५० टक्के क्षमेतेने सुरु असतील. लोकल सुरु असणार नाही. सार्वाजिनक जागा, खुले मैदान , माॉर्निंग वॉक आणि सायकल चालवण्यास परवागनी असेल. शासकीय आणि खासगी सगळी कार्यालय खुली असीतल. क्रीडा सायंकाळ सकाळी ५ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत इनडोअर आणि आऊटडोर स्पोर्टस सुरु असतील. चित्रपट आणि मालिकांचं शुटिंग सुरु करण्यात येईल. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के क्षमेतेने सुरु असतील. लग्न सोहळा मंगल कार्यालयात ५० टक्के आणि जास्तीत १०० लोक उपस्थितीत राहू शकतील. अंत्यविधी सोहळ्याला सगळ्यांना उपस्थितीत राहता येईल. मिटींग आणि निवडणूक हे कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करण्यात येतील.

बांधकाम, कृषी कामे खुली करण्यात आली आहेत. ऑनलाईन , ई-कॉमर्स सुरु करण्यात आलं आहे. जीम सलून ब्युटी पार्लर, स्पा ५० टक्के क्षमेतेने सुरू करण्यात येणार आहेत. शासकीय बस आसाम १०० क्षमतेने टक्के सुरू असतील. जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथं रेड झोन आहे तिथे जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल.

दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे – अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार

लेव्हल ३-मध्ये येणाऱ्या जिल्ह्यात काय सुरु असेल?

अत्याआवश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाणे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मांर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पाहते ५ ते सकाळी ९ मुभा असेल. ५० टक्के क्षमतेने खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू असतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार यादरम्यान सुरु असतील. स्टुडियोत चित्रीकरण परवानगी मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्यंत खुले असणार हे सोमवार ते शुक्रवार यावेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी २ पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी  २ पर्यंत सुरु असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

तिसऱ्या लेव्हलमधील जिल्हे – अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर

चौथ्या लेव्हलमध्ये काय सुरु असेल?

अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु असतील. सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर सकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरु राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला २० लोक उपस्थित राहू शकतील. बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करतील. शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार आहेत. ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरु असेल. संचार बंदी लागू असणार आहे. सलून, जिम ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. बसेस ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. बसमध्ये प्रवाशांना उभं राहता येणार नाही.

चौथ्या लेव्हलमधील जिल्हे – पुणे, (pune) रायगड

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा