Advertisement

लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घट

इंधन दरवाढ व महागाई यामुळं अनेक सर्वसामान्य प्रवासी हे रस्तेमार्ग प्रवास टाळत आहेत. अनेकजण स्वस्त व जलद प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला पसंती देत आहेत.

लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घट
SHARES

इंधन दरवाढ व महागाई यामुळं अनेक सर्वसामान्य प्रवासी हे रस्तेमार्ग प्रवास टाळत आहेत. अनेकजण स्वस्त व जलद प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला पसंती देत आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं सर्वसामान्यांनचा लोकल प्रवास थांबला आहे. त्यामुळं लोकल प्रवासी संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहेत. मात्र अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत आहेत. विनामास्क प्रवाशांमध्ये मात्र मोठी घट झाल्याचे मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.

कोरोना काळात रेल्वे स्थानकांवर मास्क परिधान न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेनं मार्शल नेमले होते. तसेच रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणीस पथकालाही विनामास्क प्रवाशांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकडून त्यांनी लाखो रुपयांचा दंड गोळा केला आहे. १७ एप्रिल ते २ जून या काळात विनामास्क प्रवास करणाऱ्या १२६९ प्रवाशांवर कारवाई करत २ लाख ४० हजार ६४५ इतकी रक्कम वसूल करण्यात आली. १ एप्रिल ते ३१ मे या काळात लोकल आणि मेल-एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल दीड लाख प्रवाशांवर कारवाई करत साडेनऊ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मे महिन्यात ५४००० विनातिकिट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून यात मुंबई लोकलमधील ३२००० प्रवाशांचा समावेश आहे. उर्वरित विनातिकीट प्रवासी हे मेल-एक्सप्रेस गाड्यांतून प्रवास करत होते. आपत्ती व्यवस्थापक कायद्याचे उल्लंधन करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल-मे महिन्यात २०१८ प्रवाशांकडून १० लाख ९ हजार असा दंड वसूल केला आहे.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनीच लोकलमधून प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा