दहिसरमध्ये नवीन अग्निशमन दल सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दहिसरच्या कांदरपाडा भागात शुक्रवारी नवीन अग्निशमन दलाचे उद्घाटन करण्यात आले. राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अग्निशमन केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी आदित्य म्हणाले की, मुंबई फायर ब्रिगेड ही देशातील सर्वात मोठी अग्निशमन यंत्रणा आहे. मुंबईच्या अग्निशमन दलाकडे जगातील अद्ययावत साधनं आहेत. यामध्ये प्रगत अग्निशमन यंत्रणा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या जीवावर खेळून कित्येकांचे प्राण वाचवले आहेत. अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत. 

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अ‍ॅडव्होकेट सुभाष वाडकर, म्हाडाचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, भाजपा खासदार गोपाल शेट्टी, स्थानिक भाजपा आमदार मनीषा चौधरी, शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, नगरसेवक तेजस्वी घोसाळकर, माजी नगरसेवक व मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोषाळकर आदी उपस्थित होते.

आगीच्या घटनांचा अधिक प्रभावीपणे सामना करण्यासाठी आणि शहरभरात अग्निसुरक्षाच्या नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने, मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने आपल्या २४ प्रभागात स्वतंत्र अग्निशमन अनुपालन केंद्रे स्थापन केली आहेत. मुंबई फायर ब्रिगेडला बळकट करण्यासाठी महापालिकेने १०५ कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. 


हेही वाचा  -

देवनार कचराभूमीवर होणार वीजनिर्मिती, स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या ठेवी बँकेएेवजी पोस्टात


पुढील बातमी
इतर बातम्या