Advertisement

पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या ठेवी बँकेएेवजी पोस्टात

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनींच्या प्रोत्साहन भत्त्याची रक्कम टपाल खात्यात ठेवली जाणार आहे. या आधी ही रक्कम बँकेत ठेवली जात होती.

पालिका शाळेतील विद्यार्थिनींच्या ठेवी बँकेएेवजी पोस्टात
SHARES

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) शाळांमध्ये (school) इयत्ता आठवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनींच्या (student) प्रोत्साहन भत्त्याची (Incentive allowance) रक्कम टपाल खात्यात (post office) ठेवली जाणार आहे. या आधी ही रक्कम बँकेत ठेवली जात होती. पालिका प्रथमच प्रोत्साहन भत्त्याचे ७ कोटी ६६ लाख रुपये टपाल खात्यात गुंतविणार आहे.

पालिका शाळेतील (bmc school) विद्यार्थिनींची (student) पटसंख्या वाढविणे, ती कायम राखणे आणि त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) प्रत्येक विद्यार्थिनीसाठी २००७ मध्ये प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रतिदिन एक रुपया देण्याचा निर्णय घेतला. पहिलीपासून ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना २,५०० रुपये दिले जायचे. पण ही रक्कम आता १ हजार ते ५ हजार रुपये करण्यात आली आहे. या आधी ही रक्कम पंजाब नॅशनल बँकेत गुंतविली जात होती. आता पालिका प्रशासनाने आपला निर्णय बदलला असून विद्यार्थिनींच्या ठेवी (Deposits) पोस्टात (post office) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींची (student) संख्या १४ हजार ८२ आहे, तर माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींची संख्या २,३९९ आहे. एकूण १६ हजार ४८१ विद्यार्थिनी असून त्यांच्या प्रोत्साहन भत्त्याची (Incentive allowance) रक्कम ७ कोटी ६६ लाख ५० हजार रुपये आहे. ही रक्कम बँकेऐवजी पोस्टात  (post office) भरली जाणार आहे. बँकेत पैसे भरायचे झाल्यास एखाद्या विद्यार्थिनीकडे पुराव्यासाठी आधार कार्ड नसेल, तर त्या विद्यार्थिनीचे खाते उघडण्यात अडचणी येत होत्या. ‘केवायसी’साठी पालकांना आणि विद्यार्थिनींना प्रत्येक वेळी पुरावे सादर करावे लागत होते. बँकेसोबत काम करताना मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनाच ही कामे करावी लागत होती. संबंधित विद्यार्थिनीचे आधार कार्ड कोणत्याही शुल्काशिवाय पोस्ट खाते काढून देत असल्याने, महापालिकेने पंजाब नॅशनल बँकेऐवजी पोस्टात मुदत ठेवी रक्कम भरण्याची तयारी दर्शविली आहे. 



हेही वाचा -

देवनार कचराभूमीवर होणार वीजनिर्मिती, स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

मेट्रो स्थानकात प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा