Advertisement

मेट्रो स्थानकात प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे.

मेट्रो स्थानकात प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा
SHARES

मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. कारण आता मेट्रो स्थानकात प्रवाशांना सलून आणि स्पाची सुविधा देण्यात येणार आहे. ऑफिस आणि घर या धावपळीत अनेकांना सलून आणि स्पामध्ये जाण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना सलून आणि स्पाची सुविधा देण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने कंबर कसली आहे.

मेट्रो रेल्वेच्या या निर्णयामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर स्टेशनवरच सुपर मार्केट, फूड प्लाजा, बँक आणि फार्मसीची सुविधा देण्याचा निर्णयही मेट्रोनं घेतला आहे. त्यामुळं आता प्रवाशांना शॉपिंगसाठी मॉल्समध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

मेट्रो स्टेशनच्या परिसरात प्रवाशांना काय-काय सुविधा दिल्या जाऊ शकतात याचं भान ठेवून मेट्रो प्रशासनाने स्थानकांचं डिझाइन तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मेट्रो-३ कॉरिडोअरच्या कफ परेड, सिद्धिविनायक, बीकेसी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या चार प्रमुख स्थानकांवर २० हजार ते ४० हजार स्क्वेअर फुटाच्या जागेवर प्रवाशांना या सुविधा दिल्या जाणार आहेत.

इतर स्थानकांवर ३०० ते १००० स्क्वेअर फूटापर्यंतच्या जागेवर सुपर मार्केट, फूड प्लाझासहित अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत. ज्या स्थानकावर प्रवाशांसह इतर लोकांची मोठी रेलचेल असते अशा स्थानकांवर स्पा आणि सलूनची सुविधा देण्यात येणार आहे. कफ परेड, सिद्धिविनायक, बीकेसी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ ही त्यापैकी काही स्थानकं असल्याची माहिती मिळते.

कुलाबा -वांद्रे -सीप्झच्या दरम्यान बांधल्या जात असलेल्या ३३ किलोमीटरच्या भूमिगत टनेलचं काम ८० टक्के पूर्ण झालं आहे. स्टेशनसहीत इतर कामं ५५ टक्के पूर्ण झाली आहेत. मेट्रो प्रशासनानं कफ परेड स्टेशन आणि सिद्धिविनायक स्टेशनवरील काही जागा भाड्यानं देण्याचा या आधीच निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करण्यात येणार असून जून २०२२पर्यंत या संपूर्ण मार्गावर मेट्रो धावणार आहे.

मेट्रो स्टेशनवर मिळणाऱ्या सुविधा

  • सलून
  • स्पा
  • फूड स्टॉल
  • एटीएम
  • सुपर मार्केट
  • बँक
  • फूड कोर्ट
  • फार्मसीहेही वाचा -

सरकता जिना फिरला उलट्या दिशेनं; प्रवासी जखमी

देवनार कचराभूमीवर होणार वीजनिर्मिती, स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा