Advertisement

सरकता जिना फिरला उलट्या दिशेनं; प्रवासी जखमी

सरकता जिना अचानक उलटा फिरल्यानं प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं.

सरकता जिना फिरला उलट्या दिशेनं; प्रवासी जखमी
SHARES

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) अंधेरी स्थानकातील (Andheri Station) सरकता जिना उलटा फिरल्यानं प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. सरकता जिना अचानक उलटा फिरल्यानं प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळं प्रवाशांची गडबड उडाली. या घटनेनंतर १७ सरकत्या जिन्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे (Western Railway) प्रशासनानं घेतला आहे.

पश्चिम रेल्वे प्रशानानं प्रवासांना (Passengers) योग्य सुविधा मिळाव्या यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्याशिवाय, अनेक सोयी-सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये स्थानकांत (Stations) सरकते जिने आणि उद्वाहन यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या सुविधा तांत्रिक बिघाडामुळं (Technical Issues) प्रवाशांना त्रासदायक ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबई उपनगरीय प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात आले असून, त्यातील बिघाडाच्या घटनाही वारंवार घडत आहेत. अंधेरी स्थानकातील (Andheri Station) प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील अशा बिघडलेल्या सरकत्या जिन्यावर (Esclator) प्रवासी चढत असताना हा जिना वरच्या दिशेनं जाण्याऐवजी अचानक खालच्या दिशेनं गेल्यानं प्रवाशाचा तोल जाऊन तो पडला आणि जखमी झाला. त्याच्यावर स्थानकावर असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्रामध्ये उपचार करण्यात आल्याची माहिती मिळते.

ब्रेक यंत्रणेत बिघाड किंवा मोटर कपलिंग यंत्रणा फेल होऊन सरकत्या जिन्याची मोटर उलट दिशेनं फिरली. त्यानंतर या स्वयंचलित जिन्याच्या अन्य यंत्रणा कार्यान्वित झाल्यानं सरकता जिना आपोआप बंद झाल्याची माहिती मिळते. या घटनेनंतर अशा तंत्राच्या १७ सरकत्या जिन्यांची दुरुस्ती तातडीनं करून मोटर बदलण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.



हेही वाचा -

एसटी महामंडळाचा १० हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर

जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा