Advertisement

एसटी महामंडळाचा १० हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर

राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) २०२०-२१ च्या नुकताच अर्थसंकल्प (Budget) जाहीर करण्यात आला.

एसटी महामंडळाचा १० हजार ४६७ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर
SHARES

राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) २०२०-२१ च्या नुकताच अर्थसंकल्प (Budget) जाहीर करण्यात आला. या जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात अंदाजित १० हजार ४६७ कोटी रुपयांची मंजुरी एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांनी राज्य परिवहन महामंडळ संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दिली. यामध्ये २ हजार नवीन बस, ६६ ठिकाणी बस स्थानकांच्या दर्जात वाढ, आगाराचं बांधकाम केलं जाणार आहे. २० मिडी बस भीमाशंकर देवस्थान विकास आराखड्याअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे.

२०२०-२१ च्या आगामी वर्षात २ हजार साध्या बस खरेदीसाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. १ हजार ३४२ जुन्या बस माइल्ड स्टीलमध्ये पुनर्बांधणी करण्याकरिता १७४.४६ कोटी, ६०० साध्या जुन्या बसच्या चॅसीसला माइल्ड स्टीलमध्ये बांधणीसाठी ७१.४० कोटींची तरतूद केली जाणार आहे.

२०१९-२० या वर्षात ७०० नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. यासाठी सरकारने ११० कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. अर्थसंकल्पात राज्य शासनाकडून बस स्थानकांचं आधुनिकीकरण करण्यासाठी १३४.८९ कोटी रुपये, कर्मचारी वेतनावरील खर्च ४ हजार ३८३ कोटी रुपये, इंधनासाठी ३ हजार ३८५ कोटी रुपये, टोल टॅक्ससाठी १५४.१७ कोटी रुपये, स्वच्छतेसाठी ७९.३८ कोटी, वीज बिल, पाणी बिल, यंत्रसामग्री देखभालीसाठी २४९.८८ कोटी, प्रवासी कर व मोटर कर यासाठी ११५२.४८ कोटी तर, सीसीटीव्हीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या प्रकल्पांसाठी तरतूद

  • प्रवासी तक्रार निवारणासाठी कॉल सेंटर २४ तास सुरू राहणार.
  • महाआॅनलाइनमार्फत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध.
  • सीसीटीव्ही, वाहन शोध प्रणाली, प्रवासी माहिती प्रणाली, बस फेऱ्यांचा वक्तशीरपणा तपासण्यासाठी व्ही.टी.एस.चा वापर करण्यात येईल.
  • चालक-वाहक विश्रांतीगृहांचे आधुनिकीकरण.
  • आधुनिक बस स्थानके, नवीन स्वच्छतागृहे, संगणकीय उद्घोषणा सुरू करण्यात येतील.



हेही वाचा -

मुंबईच्या कमाल तापमानात दुसऱ्या दिवशीही वाढच

१५ मजली इमारतीवरून उडी मारून हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा