१५ मजली इमारतीवरून उडी मारून हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या

गच्चीवरून उडी मारण्यापूर्वी शहा यांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. शहा यांनी लिहिलेली दोन ओळींची सुसाईड नोटही (Suicide note) पोलिसांना (police) त्यांच्या डेस्कवर सापडली.

१५ मजली इमारतीवरून उडी मारून हिरे व्यापाऱ्याची आत्महत्या
SHARES

आॅपेरा हाऊस (Opera House) येथील १५ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून धीरेन चंद्रकांत शहा (६१) या हिरे व्यापाऱ्याने आत्महत्या (Suicide) केली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. शहा यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही. गच्चीवरून उडी मारण्यापूर्वी शहा यांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. शहा यांनी लिहिलेली दोन ओळींची सुसाईड नोटही (Suicide note) पोलिसांना (police) त्यांच्या डेस्कवर सापडली. 

नेपियन्सी रोडवरील मातृआशिष इमारतीत धीरेन शहा आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. ते डायमंड पॉलिशिंग आणि एक्सपोर्ट कंपनीचे मालक होते. धीरेन शहा यांचं प्रसाद चेंबर्सच्या सर्वात वरच्या म्हणजेच पंधराव्या मजल्यावर ऑफिस आहे. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात आले. ९.४० ते ९.५० च्या सुमारास  इमारतीच्या टेरेसवर फेरफटका मारण्यासाठी जात आहोत, असं काही कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर काही मिनिटातच त्यांनी टेरेसवरून उडी घेतली.  धीरेन शहा यांचा जागीच मृत्यू (death) झाल्याची माहिती डीबी मार्ग पोलिसांनी दिली.

 आत्महत्येसारखं (Suicide) टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय माझा आहे, त्यासाठी कोणालाही दोषी ठरवू नये, असं शहा यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगा अमेरिकेत राहत असून ते शहांच्या व्यवसायाची परदेशातील जबाबदारी सांभाळतो. शाह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर कंपनीतील कर्मचारी आणि कुटुंबीयांचे जबाब पोलिस नोंदवणार आहेत. 



हेही वाचा -

डोंबिवलीतल्या केमिकल कंपनीत आगीचं तांडव, परिसरात प्रचंड दुर्गंधी

बसथांब्यावर मृत्यू पावलेल्या 'त्या' मुलाला अखेर ३ वर्षांनी न्याय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा