Advertisement

जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार

सोमवारी जीएसटी भवनला (gst bhavan) लागलेल्या भीषण आगीत (fire) मोठं नुकसान झालं आहे. आगीत ९ वा आणि १० वा मजला जळून खाक झाला आहे. इमारतीचा १० वा मजला आता चर्चेचा विषय झाला आहे.

जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार
SHARES

सोमवारी जीएसटी  भवनला (gst bhavan) लागलेल्या भीषण आगीत (fire) मोठं नुकसान झालं आहे. आगीत ९ वा आणि १० वा मजला जळून खाक झाला आहे. इमारतीचा १० वा मजला आता चर्चेचा विषय झाला आहे. याचं कारण म्हणजे स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये (Structural audit) १० मजला पाडण्याचे निर्देश देण्यात आले होते. व्हीजेटीआयच्या (VJTI) स्ट्रक्चरल ऑडिटमधून जीएसटी भवनातील दहाव्या मजल्याचा भार वाढल्याचे निष्पन्न झालं होतं. मात्र, याकडं दुर्लक्ष केल्याचं आता समोर येत आहे. 

२०१९मध्ये व्हीजेटीआयकडून (VJTI) जीएसटी (gst) भवनचं स्ट्रक्चरल ऑडीट (Structural audit) करण्यात आलं होतं.  दहाव्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या कार्यालयांमुळे इमारतीवर भार वाढत असल्याचा अहवाल व्हीजेटीआयने दिला होता. आता हा मजला तोडणार असल्याचं समजतं.  इमारतीच्या नवव्या मजल्यावर आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली. या आगीवर तीन तासानंतर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवता आले.  नवव्या मजल्यावरील कार्यालये नूतनीकरण केली जात होती. त्याजागी जुने लाकडी सामान ठेवण्यात आले होते. शॉकसर्किटने आग लागल्यावर जुन्या लाकडी सामानाने पेट घेऊन आग भडकल्याचे समोर आले आहे. 

जीएसटी भवनमध्ये (gst bhavan) दहावा मजला अनधिकृत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पालिकेने काहीही बेकायदेशीर बांधकाम नसल्याची माहिती दिली आहे. ही इमारत ५५ वर्ष जुनी होती. या इमारतीचे एक ते दिड वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट (Structural audit) करण्यात आले. ऑडिटसाठी व्हीजेटीआय संस्थेची नेमणूक करण्यात आली होती.  नऊ मजली इमारतीत कर्मचाऱ्यांना जागा कमी पडत असल्याने दहावा मजला बांधण्यात आला. या मजल्यामुळे इमारतीवर भार वाढला असून तो पाडून टाकावा असा अहवाल देण्यात आला आहे. त्याप्रमाणे इमारतीचा दहावा मजला काढून टाकण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच आग लागली. 



हेही वाचा -

आरे कारशेडसाठी राॅयल पामची जागा?

गुगल करणार रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय सेवा बंद, पण...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा