Advertisement

गुगल करणार रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय सेवा बंद, पण...

'स्टेशन' सेवेने देशातील ४०० स्थानके २०२० च्या मध्यापर्यंत जोडण्याचे ध्येय गुगलनं बाळगलं होतं. हे ध्येय पूर्ण झालं असलं तरी आता ही सेवाच बंद केली जाणार आहे.

गुगल करणार रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय सेवा बंद, पण...
SHARES

पुढील वर्षीपासून रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांना मोफत वायफाय (WIFI) सेवेचा लाभ घेता येणार नाही. कारण गुगलनं (Google) २०२० पर्यंत भारतासह संपूर्ण जगात आपला स्टेशन कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय गेतला आहे. गुगलचं म्हणणं आहे की, गेल्या ५ वर्षात ईंटरनेट सेवा भारतात तुलनेनं स्वस्त आणि सोईस्कर झाली आहे. त्यामुळे आता स्टेशन सेवेची आवश्यक्ता नसल्याचं गुगलनं स्पष्ट केलं आहे.    

'स्टेशन' सेवेने देशातील ४०० स्थानके २०२० च्या मध्यापर्यंत जोडण्याचे ध्येय गुगलनं बाळगलं होतं. परंतु, हा आकडा २०१८ मध्येच पार केल्याचं गुगलचे विभागीय उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी म्हटलं आहे. सध्या देशातील अनेक स्थानकांतून ही सेवा सुरू आहे. अन्य ठिकाणीही ही सेवा दूरसंचार कंपन्या, आयएसपी आणि स्थानिक प्रशासकीय संस्था यांच्या सहकार्यानं सुरू आहे.


डेटा जगभरात स्वस्त होतो

गुगलचे उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, आम्ही जून २०१ ८ मध्येच रेल्वे स्टेशनवर नि:शुल्क वायफाय देण्याचं लक्ष्य पूर्ण केलं. त्याशिवाय दूरसंचार कंपन्या, आयएसपी आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं देशभरातील इतर अनेक ठिकाणी याप्रकारची सेवा सुरू केली. तेव्हापासून ऑनलाइन सेवा विशेषत: मोबाइल डेटा जगभरात स्वस्त आणि सुलभ झाला आहे. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या ब्रिटन आणि फ्रान्सला देखील भारतानं मागं टाकलं आहे.” 


५ वर्षात इंटरनेट दर ९५% कमी

भारताव्यतिरिक्त नायजेरिया, थायलंड, फिलीपिन्स, मेक्सिको, इंडोनेशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका इथं गुगल 'स्टेशन' सेवा उपलब्ध आहे. भारताचं उदाहरण देऊन सेनगुप्ता म्हणाले की, एका अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत भारताच्या मोबाइल डेटाच्या किंमतीत ९५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे दर महिन्याला भारतीय हे १० जीबी डाटाचा वापर करतात.


रेल टेल देणार फ्री वायफाय

रेल्वे स्टेशनवर वायफाय सेवा पुरवणारी रेल टेल कंपनीनं गुगलसोबत ५ वर्षाचा करार केला होता. या करारानुसार रेलटेल कंपनीला फ्री वायफाय पुरवण्यासाठी सेटअप लावून द्यायचं होतं. गुगलनं ती जबाबदारी योग्यप्रकारे निभवली आहे. आता हा करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे गुगल ही वायफाय सुविधा पुरवणार नाही. पण असं असलं तरी रेल टेलनं मात्र ४०० स्थानकांवर वायफाय सेवा पुरवणार असल्याचं त्यांच्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे. 



हेही वाचा

रेल्वे प्रवासात झोप लागल्यास 'फोन' उठवणार

हार्बर मार्गावर एप्रिलपासून लागू होणार नवं वेळापत्रक?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा