Advertisement

आरे कारशेडसाठी राॅयल पामची जागा?

मुंबईतील वादग्रस्त आरे कारशेड (aarey car shed) प्रस्तावित जागेपासून अगदी हाकेच्या अंतरावरील राॅयल पाम (royal palm)मध्ये हलवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आरे कारशेडसाठी राॅयल पामची जागा?
SHARES

मुंबईतील वादग्रस्त आरे कारशेड (aarey car shed) प्रस्तावित जागेपासून अगदी हाकेच्या अंतरावरील राॅयल पाम (royal palm)मध्ये हलवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे मेट्रो ३ (metro 3) प्रकल्पाच्या आरे कारशेडला होत असलेला विरोध हा केवळ ठराविक बिल्डरांना फायदा मिळण्यासाठी केला जात होता, अशी चर्चा रंगली आहे.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (MMRCL) च्या माध्यमातून गोरेगावच्या आरे काॅलनीतील ८१ एकर जागेवर मेट्रो ३ (colaba-bandra-seepz) साठी कारशेड बांधण्यात येत होतं. परंतु या कारशेड उभारण्यासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याने पर्यावरणप्रमींनी झाडांच्या कत्तलीवर आक्षेप घेतला. आरेतील वृक्षतोड ताबडतोब थांबवा, आरे कारशेड इतर ठिकाणी हलवा अशी मागणी करत पर्यावरणप्रेमी आधी न्यायालयात आणि नंतर रस्त्यांवरही उतरले. 

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरण: तपास राज्याकडेच राहणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही (shiv sena) या मुद्द्यावर भाजपला घेरलं. पण दोन्ही ठिकाणी पर्यावरणप्रेमींना अपयश आलं. पाठोपाठ प्रशासनाने रातोरात २ हजारांहून अधिक झाडे कापत पर्यावरणप्रेमींना धक्का दिला. सत्तेत आल्यास आरे कारशेडचं काम थांबवून ते इतरत्र हलवू असं आश्वासन देणाऱ्या शिवसेनेने (shiv sena) सत्तेत येताच आश्वासन पाळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पदभार स्वीकारताच सर्वात पहिल्यांदा आरे कारशेडच्या (aarey car shed) कामाला स्थगिती दिली. यावरून भाजपकडून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. 

आरेतील कारशेडला (aarey car shed) विरोध होत असताना प्रस्तावित कारशेडच्या जागेपासून साधारणत: १ किमी अंतरावरच रॉयल पाम संकुल (royal palm) आहे. या संकुलाची मालकी असलेल्या कंपनीने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरे संवर्धनाचं काम करणाऱ्या वनशक्ती संस्थेला एक पत्र लिहून मेट्रो कारशेडसाठी रॉयल पामची जागा देण्याची आॅफर दिली. मेट्रो कारशेडसाठी (metro 3 aarey car shed) ३० ते ६० एकर जागा देण्याची तयारी दाखवताना त्या बदल्यात वाढीव एफएसआयची मागणी देखील या विकासकाने केली.

हेही वाचा- आरे कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवा, आदित्य ठाकरेंचं तज्ज्ञांना आवाहन

असं असताना जेव्हा आरे कारशेडला (car shed) विरोध सुरूच होता, तेव्हा पर्यावरणवादी संघटनांकडून पर्यायी जागेसाठी सरकारला सूचना केल्या जात होत्या. त्यात बहुतांश संस्थांनी राॅयल पामच्या (royal palm) जागेचा आग्रह सरकारकडे केला होता, असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ज्या आरेत कारशेड उभारण्याला संघटना विरोध करतात, त्याच आरेतील राॅयल पामची जागा पर्याय म्हणून कशी काय सुचवतात? असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांकडून या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल आहे, असं म्हटलं जात आहे.   


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा