Advertisement

आरे कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवा, आदित्य ठाकरेंचं तज्ज्ञांना आवाहन

र्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आदित्य ठाकरे (environment minister aaditya thackeray) यांची भेट घेऊन त्यांना आरे कारशेडसाठी पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी केली.

आरे कारशेडसाठी पर्यायी जागा सुचवा, आदित्य ठाकरेंचं तज्ज्ञांना आवाहन
SHARES

मेट्रो ३ च्या कारशेडबाबत तज्ज्ञांनी पर्यायी जागा सुचवली, तर राज्य सरकार नक्कीच त्याचा विचार करेल, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी आदित्य ठाकरे (environment minister aaditya thackeray) यांची भेट घेऊन त्यांना आरे कारशेडसाठी पर्यायी जागांचा विचार करावा, या मागणीचं निवेदन दिलं, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी हे आवाहन केलं.

फोरम आॅफ इन्व्हायर्मेंटल जर्नलिस्ट इन इंडिया (FEJI) या देशभरातील पर्यावरणसंदर्भात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेने मुंबई प्रेस क्लबसोबत मुंबईतील पर्यावरण बदलाच्या विषयावर एक सेमिनार घेतलं होतं. यांत आरेतील वृक्षतोडीच्या विषयावर देखील चर्चा करण्यात आली. 

यासंदर्भातील निवेदन ‘एफईजेआय’चे सहसचिव अतुल देऊळगावकर (atul deulgaonkar) यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (environment minister aaditya thackeray) यांची भेट घेऊन त्यांना दिलं. या निवेदनात आरेतील पर्यावरण, वनसंपदा वाचवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ पावलं उचलावीत, आरे कारशेडसाठी पर्यायी जागांचा विचार करावा तसंच मुंबईतील प्रदूषण घटवण्यासाठी अधिकाधिक सार्वजनिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, या मागणीचं निवेदन दिलं. त्या मुद्द्यावर पर्यावरणमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

आरेचं जंगल (aarey jungle) नष्ट होणार असेल, तर हे जंगल नष्ट झाल्यावर मुंबईला पुराचा धोका किती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे किती हानी होईल. आता या जंगलाचा किती फायदा होतोय. हे न विचारात घेता केवळ आर्थिक आणि बांधकामाच्या निकषावर आपण ठरवायला लागलो. तर ते अर्थशास्त्र पुरेसं आणि समग्र नाही, असं यावेळी देऊळगावकर म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा