नवी मुंबईतील मॉल बंद करण्याचे आदेश, दुकान मालकांच्या आनंदावर विरजण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई इथले मॉल बंद करण्यात आले होते. पण पाच महिन्यानंतर बुधवारपासून मॉल सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार मॉल उघडण्यात आले. मॉल सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानं शॉप मालक आणि कर्मचारी आनंदात होते. मात्र नवी मुंबईतील शॉप मालकांचा आणि कर्मचाऱ्यांचा आनंद एक दिवसच टिकला. नवी मुंबईतील मॉल पुन्हा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मॉलमध्ये गर्दी होत असल्याचं सांगत नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांनी दुसऱ्याच दिवशी मॉल बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ५ ऑगस्टला मॉल खुले केले गेले. पण दुसऱ्याच दिवशी ६ ऑगस्टला मॉल बंद करण्यात आले.

हेही वाचा : वसई, विरार, नालासोपाऱ्यातील कन्टेंमेंट झोनची नवी यादी

अहवालानुसार, मॉलमध्ये सामाजिक अंतर पाळले गेले नाही आणि NMMC नं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केलं गेलं. नवी मुंबईत मॉल्स उघडल्यानंतर मॉल्समध्ये गर्दीने वाढली, सामाजिक अंतरं पाळलं गेलं नाही. त्याचवेळी इतर शहरांमधील नागरिक देखील मॉलमध्ये येऊ लागली. परिणामी NMMC कारवाई करण्यास भाग पाडलं गेलं. त्यामुळे मॉलसह सर्व मॉल्स पुन्हा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग बरोबर सॅनिटायझर, टेम्प्रेचर गन, आयसोलेशन रूमची व्यवस्था करण्यात आली होती. मॉलमध्ये प्रवेश केलेली आणि बाहेर पडलेल्या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी सेन्सर मशीनही बसविण्यात आल्या आहेत. पण हा आदेश आल्यानं पुन्हा एकदा शॉप मालकांच्या आनंदावर पाणी फेरलं गेलं.  

नवी मुंबईत COVID 19 मधील एकूण रुग्णांची संख्या १६ हजार ९५७ झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे नवी मुंबईत ४४१ रुग्णांचा मत्यू झाला आहे. NMMC नं दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात सध्या ४ हजार ०४२ कोरोना रुग्ण सक्रियं आहेत. तर १२ हजार ४७४ रुग्ण बरे झाले आहेत.


हेही वाचा

बापरे! ठाण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेली १ लाखांच्या पुढे

कोरोनातून बरे झालेले २२ रुग्ण प्रकृती खालावल्यानं पुन्हा रुग्णालयात

पुढील बातमी
इतर बातम्या