Advertisement

कोरोनातून बरे झालेले २२ रुग्ण प्रकृती खालावल्यानं पुन्हा रुग्णालयात

एकिकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे. मात्र दुसरीकडे आलेल्या या बातमीनं चिंतेत भर टाकली आहे.

कोरोनातून बरे झालेले २२ रुग्ण प्रकृती खालावल्यानं पुन्हा रुग्णालयात
SHARES

कोरोनाव्हायरस संदर्भात एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. २२ कोरोनाबाधिक रुग्ण बरे होऊन रुग्णालयामधून घरी परतले होते. परंतु घरी परतलेल्या या २२ रुग्णांची प्रकृती पुन्हा खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. कोरोना विषाणू जरी शरीरातून नष्ट झाला असला तरी त्याचे परिणाम कायम राहू शकतात, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली होती.   

याचा अर्थ असा आहे की, जे रुग्ण कोरोनामधून बरे होत आहेत त्यांच्यावर कोविडचा परिणाम रोगातून बरे झाल्यानंतरही दिसून येत आहे. डॉक्टरांच्या मते, कोविड पासून बरे होणारे रुग्ण, एका महिन्यानंतर, ते पुन्हा तब्येतीच्या तक्रारी घेऊन रूग्णालयात येत आहेत.

हेही वाचा : राज्यात ११ हजार ५१४ नवे रुग्ण, पहा तुम्हच्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या

डॉक्टरांना आढळलं की, रूग्णांना फुफ्फुसाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. फुफ्फुसांच्या उतींवर एक प्रकारचे डाग दिसून येत आहेत. ज्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. आता या २२ रुग्णांना सध्या ऑक्सीजनवर ठेवण्यात आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा हे रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले त्यावेळी त्यांची फुफ्फुसा संदर्भात कोणतीही तक्रार नव्हती. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार रुग्णालयाचे डीन हेमंत देशमुख म्हणाले की, कोरोना हा मुख्यतः फुफ्फुसाचा आजार आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णांना पल्मनरी फायब्रोसिस (Pulmonary Fibrosis) होण्याची शक्यता असते.

ते हे देखील म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये वयाशी काही संबंध नसतो. डॉ. देशमुख म्हणाले की, पल्मनरी फायब्रोसिसचा परिणाम अधिक काळ राहतो. हे कमी करण्यासाठी रुग्णाला औषधं दिली जातात. या औषधांच्या मदतीनं त्यावर नियंत्रण मिळवलं जातं.

काही दिवसांपूर्वी एका संशोधनात समोर आलं होतं की, कोरोना रुग्ण बरा झाला तरी त्याच्या प्रकृतीवर याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. अभ्यासातून शास्त्रज्ञांना कळाला की, कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना फुफ्फुसाच्या, मेंदूच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याच्यानुसार या समस्या कायमस्वरूपी पण राहू शकतात. आता अशा केसेस समोर आल्यानं यात तथ्य आहे की काय? असा प्रश्न निर्माण होतो. हेही वाचा

अरे व्वा! नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात

वसई, विरार, नालासोपाऱ्यातील कन्टेंमेंट झोनची नवी यादी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement