Advertisement

अरे व्वा! नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात

नवी मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या आता हळू हळू नियंत्रणाखाली येत आहे.

अरे व्वा! नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात
SHARES

नवी मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या आता हळू हळू नियंत्रणाखाली येत आहे. नवी मुंबईतही कोरोना रूग्णांचं बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. सध्या नवी मुंबईत कोरोनाचे ७४ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

नवी मुंबईतील कोरोनाचे रुग्ण ३९ दिवसांत दुप्पट होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेनं कोरोनाची चाचणी करण्यासाठी (एनएमएमसी) स्वत:ची लॅब सुरू केली आहे. यामध्ये दररोज १ हजार आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची क्षमता आहे.

नवी मुबई महानगरपालिकेनं स्वत:ची लॅब सुरू केल्यानं आता त्यांना खाजगी लॅब्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही. खाजगी लॅब बहुतांश वेळी चाचणीचा निकाल देण्यास उशीर करायचे. निकाल उशीरा आल्यानं संक्रमित व्यक्तींच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये उपचार करण्यास अडथळा निर्माण होत होता. 

हेही वाचा : दहिसर ,बोरिवली, कांदिवली आणि मालाडमध्ये 'इतके' कोरोना रुग्ण

शहरातील कोरोनोव्हायरस-पॉझिटिव्ह व्यक्तींची साखळी तोडण्यासाठी संक्रमित व्यक्तींना पटकन शोधून काढणे आणि वेगळं करण्यावर नवी मुंबई पालिका अधिक भर देत आहे. पालिकेच्या स्वत:च्या लॅबमुळे त्यांना ते शक्य झालं.

५ ऑगस्टपासून नियम आणि शर्तीनुसार मॉल पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात आली. तसंच मॉल आणि ग्राहकांनी सुरक्षा उपायांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही जनतेला केलं. पण याचा अगदी विरुद्ध झालं. त्यामुळे नवी मुंबई मनपा आयुक्तांनी मॉल पुन्हा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.



हेही वाचा

वसई, विरार आणि नालासोपारा इथली नवी कन्टेंमेंट झोनची यादी

वसई-विरारमध्ये बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा