Advertisement

नवी मुंबईत ४०२ आयसीयू बेड, १७३ व्हेंटिलेटर उपलब्ध होणार

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ ही मोहीम राबवून रुग्णवाढीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नवी मुंबईत ४०२ आयसीयू बेड, १७३ व्हेंटिलेटर उपलब्ध होणार
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २५३ रुग्ण सापडले आहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १६ हजार ६७९ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने   नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ ही मोहीम राबवून रुग्णवाढीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर  बांगर यांनी गंभीर स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेडची कमतरता असल्याने हा प्रश्न सोडवण्याचं काम हाती घेतलं आहे.


नवी मुंबईकरांसाठी आता ४०२ आयसीयू बेड, १७३ व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीवही गेले आहेत. यामुळे महापालिका हद्दीतील गंभीर रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध व्हावेत यासाठी नेरुळ सेक्टर ५ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासोबत २०० आयसीयू बेड आणि ८० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्याचा करार करण्यात आला आहे.


डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्यावतीने १० ऑगस्टपर्यंत ५० आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यानंतर १० दिवसांच्या ३ टप्प्यांमध्ये ३० दिवसांमध्ये एकूण २०० आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हेही वाचा

Mumbai Rains : सोमवार-मंगळवार कोसळलेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद

सांताक्रूझ : नाल्या जवळील २ घरंं कोसळली, दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा