Advertisement

दहिसर ,बोरिवली, कांदिवली आणि मालाडमध्ये 'इतके' कोरोना रुग्ण

या आकडेवारीपैकी पश्चिम उपनगरातील या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत.

दहिसर ,बोरिवली, कांदिवली आणि मालाडमध्ये 'इतके' कोरोना रुग्ण
SHARES

महाराष्ट्रमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात सर्वात जास्त रुग्ण मुंबईच्या पश्चिम उपनगरात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. पालिका आणि पोलिस प्रशासन पश्चिम भागात लॉकडाऊन सक्तीनं पाळला जावा याकडे लक्ष देत आहेत. जेणेकरून कोरोना रुग्णांचा आकडा वाढणार नाही.

कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी डोर टू डोर स्क्रिनिंग आणि स्मार्ट हॅलमेट स्क्रिनिंगची पण सुरुवात करण्यात आली होती. याशिवाय आरोग्य शिबिर देखील राबवली गेली. ताप मोजण्यासाठी स्पेशल क्लिनिक सुरू करण्यात आली.

हेही वाचा : मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७८ दिवसांवर

पालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ३ ऑगस्टपर्यंत मालाडमध्ये एकूण ७ हजार १०७ नागरिक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. तर दहिसरमध्ये ३ ऑगस्टपर्यंत २ हजार ९१३ कोरोनाचे रुग्ण आढळले. बोरिवलीमध्ये ३ ऑगस्टपर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५ हजार ६८० झाली आहे. कांदिवलीमध्ये ३ ऑगस्टपर्यंत कोरोना कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५ हजार २८४ पर्यंत पोहोचली आहे.

मुंबईत मंगळवारी कोरोनाचे ७०९ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यत एकूण रुग्णांची संख्या ११८१३० पर्यंत पोहोचली आहे. तर ९०९६२ इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मंगळवारपर्यंत ६ हजार ५४६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



हेही वाचा

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २५३ रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ९९ नवीन कोरोना रुग्ण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा