Advertisement

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७८ दिवसांवर

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता घटत चालली आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ७८ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७८ दिवसांवर
SHARES
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आता घटत चालली आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ७८ दिवसांवर पोहोचला आहे. तर रुग्ण वाढीचा दर ०.८९ टक्के झाला आहे.


सोमवारी मुंबईत कोरोनाचे नवीन ९७० रुग्ण आढळले. तर ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत असल्याचं दिसून येत आहे.  मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ४२१ झाली आहे. यापैकी ९० हजार ८९ रुग्ण बरे झाले आहेत.


सोमवारी १,७९० रुग्ण बरे झाले असून त्यांना  रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत ६ हजार ४९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या मुंबईत विविध रुग्णालयांमध्ये २० हजार ५४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात सोमवारी करोनाच्या ८,९६८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या साडेचार लाखांपेक्षा अधिक झाली आहे.  


राज्यात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक आहे. सोमवारी १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ८७ हजार ०३० रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७  हजार १७  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. 



हेही वाचा

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर लँडस्लाईड, गोरेगावच्या दिशेनं जाणारी वाहतूक जाम

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जाहीर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा