Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ९९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ( ४ ऑगस्ट) ९९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ९९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ( ४ ऑगस्ट) ९९ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कामोठे आणि खारघर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  


मंगळवारी १३५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. पनवेल महापालिका हद्दीतील  आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये कळंबोली-रोडपाली येथील एकूण २८, कामोठ्यातील २७, खांदा कॉलनीतील १६, खारघरमधील ९, पनवेलमधील ६, नवीन पनवेलमधील ६, तळोजा आर‌एएफ कँप येथील २ तसेज, तळोजा, तळोजा फेज-२, तळोजा जेल येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  


आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ७१७५ कोरोनारूग्णांपैकी ५६४२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १७२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे १३६१ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.  हेही वाचा

२४ तासात मुंबईत ४२ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी

ठाण्यात पावसाचा पहिला बळी, विजेचा धक्का लागून मत्यू  

Read this story in हिंदी
संबंधित विषय