Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २५३ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी ( ४ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन २५३ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २५३ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी ( ४ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन २५३ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १६ हजार ६७९ झाली आहे.  

मंगळवारी बेलापूर ३४, नेरुळ ६८, वाशी २३, तुर्भे ९, कोपरखैरणे ४३, घणसोली ३०, ऐरोली ४१, दिघामध्ये ५ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २०० जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३३, नेरुळ ५८, वाशी १३, तुर्भे १८, कोपरखैरणे २३, घणसोली १४, ऐरोली २३ आणि दिघामधील १८ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ११३६१ वर पोहोचली आहे.  तर मृतांचा आकडा ४३७ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ४८८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

नवी मुंबई कोरोनाची लागण मोठा व्यक्तीबरोबरच लहान मुलांना देखील होत असल्याने पालकवर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत नवी मुंबईतील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १३,१८३ इतकी असल्याचे तसेच त्यातील ६ ते १६ वयोगटातील ८१७ शाळकरी मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे नवी मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.



हेही वाचा

२४ तासात मुंबईत ४२ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी

ठाण्यात पावसाचा पहिला बळी, विजेचा धक्का लागून मत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा