Advertisement

अंबरनाथमध्ये सैल होतोय कोरोनाचा विळखा

अंबरनाथमध्ये कोरोनाचा विळखा हळुहळू सैल पडताना दिसून येत आहे. अंबरनाथमध्ये मंगळवारी केवळ १२ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

अंबरनाथमध्ये सैल होतोय कोरोनाचा विळखा
SHARES

अंबरनाथमध्ये कोरोनाचा विळखा हळुहळू सैल पडताना दिसून येत आहे. अंबरनाथमध्ये मंगळवारी केवळ १२ नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अंबरनाथमधील स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. शिवाय रहिवाशांनी दाखवलेल्या संयमाचंही कौतुक करावं लागेल.

सद्यस्थितीत अंबरनाथमध्ये ३४३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी आढळून आलेल्या १२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ८ जणांचा होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर उर्वरीत जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबरनाथमध्ये मंगळवारपर्यंत ३४४८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. शहर परिसरात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८५.६० इतकी आहे. तर १०.४८ टक्के अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अंबरनाथमध्ये आतापर्यंत १५९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्याची टक्केवारी ३.९१ इतकु आहे. तर आतापर्यंत ९५४६ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून २७१ कोरोना चाचणीचे अहवाल यायचे आहेत.

हेही वाचा- कोरोनाचा कहर! राज्यात दिवसभरात ३०० जणांचा मृत्यू, ७७६० नवे रुग्ण

कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता जिल्ह्यातील अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषद, शाहपूर, मुरबाड नगर पंचायतीतील कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ आॅगस्टपर्यंत कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारपर्यंत सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. मंगळवारी दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ७७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचं प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२  हजार १५१  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात मंगळवारी ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

हेही वाचा- मुंबईत ७०९ नवे रुग्ण, दिवसभरात ५६ जणांचा कोरोनाने मृत्यू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement