भायखळा पुलावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

डॉ. आंबेडकर मार्ग ते जे.जे. पुलाला जोडलेल्या भायखळा पुलावरून लवकरच अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या पुलावर अवजड वाहनांना बंदी घातल्यामुळं काळबादेवी आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये मालवाहून नेणाऱ्या वाहनचालकांना वळसा घालून क्रॉफर्ड मार्केट परिसरात यावं लागणार आहे.

४ पूल धोकादायक

आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी रेल्वे रुळाच्या बाजूच्या संरचनांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं काम हाती घेतलं आहेया ऑडिटनुसार, भायखळा पुलावरून जड वाहनांना प्रवेश न देण्याचा सल्ला या तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये भायखळा, चिंचपोकळी, करीरोड आणि घाटकोपरमधील पूल हे ४ पूल धोकादायक असल्याचं आढळून आलं होतं.

१६ टन सामान

या चारही पुलावरून अनेक वाहनांतून १६ टन सामान वाहून नेण्यात येत असल्याच आढळून आलं होतं. त्यामुळं या चारही पुलावरील वाहतुकीचा वेग ३० किलोमीटर पर लिमिट ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. दक्षिण मुंबईस जोडणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी भायखळ्यातील उड्डाणपुलाचा समावेश होतो. या पुलाच्या प्राथमिक पाहणीत येथून अवजड वाहनांना बंदी करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळं लवकरच हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.


हेही वाचा -

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार

कुलाब्यात परदेशी महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या