कुलाब्यात परदेशी महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

मुंबईतील कुलाबा परिसरात एका परदेशी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कुलाब्यात परदेशी महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक
SHARES

मुंबईतील कुलाबा परिसरात एका परदेशी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहेपद्माकर नांदेकर असं या आरोपीचं नाव आहेयाप्रकरणी पीडित महिलेनं कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचतारांकित हॉटेलमध्ये तरुणी नशेत असताना, नांदेकरनं तिच्यावर अत्याचार केल्याचं तरुणीनं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी पद्माकर याला मंगळवारी अटक केली असून घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळं पुन्हा एकदा मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.


ब्राझीलची नागरिक

पीडित महिला ही ब्राझील देशाची नागरिक असून, ही महिला मुंबईत फिरण्यासाठी आली होती. पद्माकर नांदेकर हा कफ परेड रेसिडंट्स असोसिएशनचा प्रमुख असून, तो १५ एप्रिल रोजी या तरुणीला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटला होता. पहिल्या भेटीतच दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघांनी मद्यपान केलं. त्यावेळी या महिलेला दारूची नशा इतकी झाली होती की, तिला चालायला ही जमत नव्हतं. याच संधीचा फायदा घेत नांदेकरनं तिच्यावर अत्याचार केले. 


घटनेची लेखी तक्रार

या घटनेनंतर पीडित महिलेनं कफ परेड पोलिस ठाण्यात घडल्या प्रकाराची लेखी तक्रार नोंदवलीपीडित महिलेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पद्माकर याला मंगळवारी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.हेही वाचा -

रेल्वे स्थानकात एका क्लिकवर मिळणार उसाचा रस

पश्चिम रेल्वेनं ७१८ बेघर मुलांची केली घरवापसीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा