Advertisement

रेल्वे स्थानकात एका क्लिकवर मिळणार उसाचा रस

आयआरसीटीसीनं पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात उसाच्या रसाची स्वयंचलित मशीन बसविली आहे. त्यामुळं प्रवाशांना एका क्लिकवर उसाचा रस प्यायला मिळणार आहे.

रेल्वे स्थानकात एका क्लिकवर मिळणार उसाचा रस
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वे स्थानकात उसाचा रस प्यायला मिळणार आहे. आयआरसीटीसीनं पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकात उसाच्या रसाची स्वयंचलित मशीन बसविली आहे. त्यामुळं प्रवाशांना एका क्लिकवर उसाचा रस प्यायला मिळणार आहे. या उसाच्या रसासाठी प्रवाशांना ३० रुपये मोजावे लागणार आहेत.


सरबत विक्रीवर बंदी

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकांत काही दिवसांपुर्वी अस्वच्छ पद्धतीनं लिंबू सरबत तयार केल्याचा एका कामगाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर, मध्य रेल्वेनं या विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करत सरबत विक्रीवर बंदी घातली.


सरबत देणारी वेंडिंग मशीन 

मुंबईत वाढत्या उकाड्यामुळं प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आधुनिक पद्धतीनं कमीत कमी मानवी संपर्काआधारे सरबत देणारी वेंडिंग मशीन रेल्वे कॅटिरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडनं (आयआरसीटीसी) आणली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकात अत्याधुनिक स्वयंचलित उसाचा रस देणारी मशीन बसवण्यात आली आहे.


आरोग्यासाठी धोकादायक

उसाचा रस बनवणारा व्यक्ती उघड्या हातांनी उसाचे तुकडे मशीनमध्ये टाकते. तसंच, उसाच्या रसासाठी वापरण्यात येणारा बर्फही चांगल्या दर्जाचा नसून, हा उसाचा रस आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळं आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी रेल्वे स्थानकात उसाचा रस तयार करण्यासाठी ‘वेंडिंग मशीन’ बसवण्यात आली आहे. या मशीनची किंमत २ लाख १० हजार रुपये असणार आहे.



हेही वाचा -

आधी मोतीलालनगरच्या रहिवाशांचा विश्वास जिंका, मगच पुनर्विकास करा' - शालिनी ठाकरे

पश्चिम रेल्वेनं ७१८ बेघर मुलांची केली घरवापसी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा