मुंबईच्या या परिसरात दिवसेंदिवस वाढते कोरोनाग्रस्तांची संख्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली. मुंबईतील कोरोनाची संख्येवर आळा घालण्यासाठी महापालिका विविध प्रयत्न करत असली, कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा दररोज समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरात कोरोनाचा संक्रमण वाढला आहे. या परिसरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. त्यामुळं या भागात पोलीस व महापालिक लॉकडाऊन पाळनं सक्तीचं करत आहेत.

मागील काही दिवसांपासून पश्चिम उपनगरातील मालाड, कांदिवली, बोरिवली परिसरात स्क्रिनिंग व स्मार्ट हेलमेटचा वापर करत स्क्रिनिंग करण्यात येत आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, मालाड परिसरात सर्वाधिक रुग्ण आहेत. तसंच, २१ जुलैपर्यंत मालाड परिसरात ६४२६ जणांना कोरोनाची लागण झाली. दहिसरमध्ये २५१०, बोरिवली मध्ये ४६४७ आणि कांदिवलीमध्ये ४४८२ जणांना कोरोनाची लागण झाली.

कोरोनाबाबत दररोज महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत १३१० जणांना कोरोनाची बाधा झाली. तसंच, ५८ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही १ लाख ०४ हजार ५७२ वर पोहोचली आहे. त्याशिवाय, आतापर्यंत ७५ हजार ११८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


हेही वाचा -

Best Mini Ac Bus कोरोनाच्या भीतीनं प्रवासी टाळताहेत बेस्टच्या मिनी एसी बसचा प्रवास

व्हाॅट्स अॅपवर वरिष्ठांची बदनामी करणे पडले महागात


पुढील बातमी
इतर बातम्या