व्हाॅट्स अॅपवर वरिष्ठांची बदनामी करणे पडले महागात

हा संदेश वरिष्ठांविरोधात इतरांमध्ये आकस निर्माण होईल, आक्षेपार्ह, अवमानकारक व चारित्र्य हनन करणारा होता.

व्हाॅट्स अॅपवर वरिष्ठांची बदनामी करणे पडले महागात
SHARES

व्हाॅट्स अॅप (Whats app)वर चुकीचे मेसेज पसरवू नका, कुणाची बदनामी करून नका असे पोलिसांकडून वारंवार सांगितले जाते. मात्र पोलिसांकडून आपल्या वरिष्ठांची बदनामी केल्याचा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या निरीक्षकाने आपल्या वरिष्ठांबाबत व्हॉट्स अॅप ग्रुपवर त्यांच्या विरोधात संदेश पाठवला होता. या घटनेची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त पोलिस आयुक्त(दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) यांनी नुकतेच त्या निरीक्षकाचे निलंबनाचा आदेश जारी केला आहे.

हेही वाचाः- नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३०३ रुग्ण

मुंबई पोलिस (Mumbai police) दलात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले अनुप संभाजी डांगे यांची काही दिवसांपूर्वीच दक्षिण प्रादेशिक परिमंडळ विभागात बदली करण्यात आली होती. त्यावेळी गावदेवी पोलिस (Gavdevi police) अधिका-यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांनी एक संदेश पाठवला. हा संदेश वरिष्ठांविरोधात इतरांमध्ये आकस निर्माण होईल, आक्षेपार्ह, अवमानकारक व चारित्र्य हनन करणारा होता. याची कूणकूण वरिष्ठांपर्यंत पोहचली. या घटनेची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलिस आयुक्त(दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) यांनी डांगे यांचे निलंबन केल्याचे आदेश जारी केले आहेत.

हेही वाचाः- लोकल सेवा सुरू करण्याची मागणी योग्यच, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच

त्याचं झाले असे की, गेल्यावर्षी २३ नोव्हेंबरला गावदेवी येथील डर्टी बन्स पब (Dirty Buns Pub) रात्री उशीरापर्यंत सूरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलिस तेथे गेले होते. त्यावेळी प्रसिद्ध हिरे व्यापारी व निर्माता भरत शहाचा नातू यश याने पोलिस नाईक संतोष पवार यांना मारहाण केली होती. त्यात पवार यांचा गणवेशही फाटला होता. त्यानंतर इतर पोलिसांनी मध्यस्थी करून पवार यांची सुटका केली व यश व त्याच्या काही मित्रांना घेऊन पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी यश व एका मैत्रीणीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाशी संबंध नसलेल्या व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्या व्यक्तीचा याप्रकरणाशी काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले. त्या प्रकरणाचा ठपका ठेवत डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यानंतर गावदेवी अधिका-यांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर डांगे यानी टाकलेल्या एका संदेशाची गंभीर दखल घेत अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी डांगेंशी संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा