Corono virus: मुंबईत बार, पब, डिसको, आॅर्केस्ट्रा बारवर बंदी

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांना करवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Corono virus:  मुंबईत बार, पब, डिसको, आॅर्केस्ट्रा बारवर बंदी
SHARES

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व डान्सबार, आॅर्केस्ट्रा, पब, डिसको, बंद ठेवण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहेत. या आवाहानाला प्रतिसाद देत हॉटेल, बार मालकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे ठरवले आहे. 31 मार्चपर्यंत हे बार, आँर्केस्ट्रा, पब, डिसको बंद राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांना करवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.


कोरोना हा संसर्ग जन्य रोग असून गर्दीच्या ठिकाणी त्याची लागण मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 17 मार्च ते 31 मार्चपर्यंत तरी बार, आँर्केस्ट्रा, पब, डिसको बंद राहणार आहे. त्याचा फायदा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तर होईलच, माञ अनेकदा नशेतून काही जण चुकीचे पाऊल उचलतात. त्या गोष्टीॆना ही आळा बसेल.

यापूर्वी शहरातील शाळा, मॉल्स, नाट्यगृह, चौपाट्या, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. दरम्यान, ट्रेन आणि बस-सेवा अत्यावश्‍यक सेवा आहेत त्या बंद करता येणार नाहीत. राज्यात एकूण 41 करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स 12 दिवस तर शाळा आणि महाविद्यालयं 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा