गावदेवीत शेड पडून एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी


SHARE

मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचं काम सध्या महापालिकेनं हाती घेतलं आहे. त्यानुसार गुरुवारी गावदेवी, केम्स कॉर्नरजवळील एका अनधिकृत कार पार्किंगवर कारवाई सुरू असताना पार्किंगचं शेड पडून योगेंद्र राम (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर किशोर रामदे (३५) नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली.

मुंबई महापालिकेतर्फे सुरू असलेल्या कारवाईत फेरीवाल्यांपासून मोठ्या हॉटेल्सवर हातोडा चालवला जात आहे. महापालिकेच्या कारवाईचा धसका व्यावसायिकांनी घेतल्याने काहींनी स्वत: हून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरूवात केली आहे. तर बहुतांश ठिकाणी महापालिकेकडून अनधिकृत बांधकामे तोडली जात आहेत.

यानुसार गुरुवारी गावदेवी, केम्स कॉर्नर येथील एका निवासी इमारतीखालील अनधिकृत बांधकाम हटवण्याचं काम करताना पार्किंग शेड पडून दोन जण गंभीर जखमी झाले. यामध्ये योगेंद्र राम आणि किशोर रामदे यांचा समावेश होता. दोघांनाही जे. जे. रुग्णालयात नेलं असता योगेद्र राम यांचं निधन झाल्याचं डाॅक्टरांनी स्पष्ट केलं. तर रामदे यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर संजय सुरसे यांनी दिली.हेही वाचा-

हॉटेल्सवरील कारवाई पुन्हा सुरू, २ दिवसांत १३७ बेकायदा हॉटेल्सवर हातोडा


संबंधित विषय