Advertisement

हॉटेल्सवरील कारवाई पुन्हा सुरू, २ दिवसांत १३७ बेकायदा हॉटेल्सवर हातोडा


हॉटेल्सवरील कारवाई पुन्हा सुरू, २ दिवसांत १३७ बेकायदा हॉटेल्सवर हातोडा
SHARES

कमला मिलमधील आगीच्या दुघर्टनेनंतर सलग दोन दिवस हॉटेल्स, पब आणि हुक्का पार्लरविरोधात धडक कारवाई करून शांत झालेल्या महापालिकेने पुन्हा एकदा हॉटेल्सविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसांमध्ये सुमारे ८०० हॉटेल्सची तपासणी करून १३५ हॉटेल्समधील अनाधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला आहे. पण एकाच आठवड्यात आयुक्तांनी दोन वेगळ्या प्रकारचे आदेश दिल्यामुळे हॉटेल्सवरील कारवाई नक्की कोणत्या स्वरुपाची असेल याबाबत विभागाचे अधिकारीच गोंधळात सापडले आहेत.


अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ

कमला मिलमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबोव्ह पबला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेत १४ जणांचा बळी गेल्यानंतर ३० व ३१ डिसेंबर रोजी महापालिकेने धडक कारवाई करून सुमारे ६५० हॉटेल्सवर कारवाई केली. परंतु त्यानंतर ही कारवाई थांबवून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व हॉटेल्सना १५ दिवसांची मुदत देऊन वाढीव बांधकाम तोडून टाकण्याच्या सूचना करण्याचे आदेश सर्व सहायक आयुक्तांना दिले. परंतु त्यानंतर दोनच दिवसांमध्ये महापालिका आयुक्तांनी अग्निशमन दलाची एनओसी तपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.


पुन्हा कारवाई

अशा सर्व गोंधळात बुधवारपासून पुन्हा सर्व हॉटेल्स आणि पबची तपासणी करून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. अग्निशमन दल, आरोग्यविभागाचे अधिकारी, इमारत व कारखाने विभागाचे प्रत्येकी एक अधिकारी याप्रमाणे पथक तयार करून ही धडक कारवाईची मोहीम राबवण्यात आली. त्यानुसार २४ विभाग कार्यालयात २ दिवसांमध्ये ७९६ हॉटेल्स व पबची तपासणी करण्यात आली. यामधील १३५ हॉटेल्समध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याचं आढळून आल्यावर ते तोडण्यात आले.


'या' हाॅटेल्सचा समावेश?

यामध्ये जाफरभाई दिल्ली दरबार, ग्रँट रोड येथील फाईव्ह स्पाईस, माटुंगा येथील शारदा भवन स्वागत, गार्मीश, रॉयलस्टोन, लोअरपरळ-वरळीमधील जाफरान तोडी, होपीपोळा, वूडसाईड, किचनस्वेअर, लेडीबागा, कॅफेझू, व्हेवरपॉट, ग्रँड मामा, फाटीबाव, दादर-माहिममधील लक्ष्मी, लीना, तंदूर, गोल्डन, अपना, शगुन, वेलकन, वांद्र्यातील टॅब, मुगल तडका, अंधेरी पूर्व भागात मनमंदी फरसाण, विश्वास फरसाण, गार्डन, गोरेगावमधील कोळी किचन, ग्रीन्स, मालाडमधील सुलभी, फेमस वडापाव, कुर्ला येथील जमजम हॉटेल, आनंद फरसाण मार्ट, देवनारमधील गरीब नवाज, घाटकोपरमधील न्यू चायना टाऊन, नयकार, अचीजा, मुलुंडमधील वूडलँड, उमा पॅलेस, रुची, बावर्ची, बोरीवलीतील केणी, ग्रीन अंकल, सारस्वत, सिम्पली, गोडबोले, निलम, शिवम, बे व्हयू, दहिसरमधील फिसी, पायल, गोल्डन प्लेट, कोकण स्वाद, कृष्णा व्हेज आदी १३७ हॉटेलवर कारवाई करण्यात आली.


अनियिमितता आढळल्यास कारवाई

या तपासणीत काही प्रमाणात अनियिमितता आढळल्यास त्याबाबत महापालिकेच्या संबंधित नियम व पद्धतीनुसार नोटीस देऊन निश्चित कालावधी दरम्यान अपेक्षित बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले जातात. त्याचबरोबर तपासणी दरम्यान अनधिकृत बांधकामे आढळल्यास किंवा दरवाजे बंद करण्यात आल्याचं आढळल्यास तात्काळ तोडक कारवाई करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्यास ते हॉटेल त्वरीत सील करण्यात येत असल्याचं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

पालिकेची धडक कारवाई सुरूच, वांद्रे-अंधेरीत बांधकामं भुईसपाट!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा