आॅनलाईन अभ्यास घेताना घ्या ‘ही’ काळजी, नाहीतर अकाऊन्ट होईल साफ

सध्या सायबर चोरटे अल्पवयीन मुलांच्या मानसिकतेचा किंवा त्यांना प्रलोभन दाखवून सायबर फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आॅनलाईन अभ्यास घेताना घ्या ‘ही’ काळजी, नाहीतर अकाऊन्ट होईल साफ
SHARES

कोरोना (Coronavirus)मुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. देशाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याने सरकारने आता मुलांना आॅनलाईन शिक्षण (online study) सुरू केले आहे. त्यामुळे लहान मुलांचा इंटरनेट आणि सोशल मिडियावरील वावर वाढला आहे. मात्र पाल्यांच्या सोशल मिडियावरील हालचालींवर पालकांनीही लक्ष ठेवण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी (Cyber police) केले आहे. कारण पाल्याच्या एका चुकीच्या क्लिकमुळे पालकांचे मोठे नुकसान होऊ शकते.

हेही वाचाः- कल्याण डोंबिवलीत ४२१ नव्या रुग्णांची नोंद

विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती करते कि, आपले पाल्य ऑनलाईन सर्चिंग करताना. जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे, याची  माहिती करून घ्या ,तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाइट्सवर क्लीक करत आहेत,किंवा काय वेबसाईट ब्राउझ करत आहेत यावर लक्ष ठेवा. कारण सध्या सायबर चोरटे अल्पवयीन मुलांच्या मानसिकतेचा किंवा त्यांना प्रलोभन दाखवून सायबर फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  

सोशल मिडियावर पोर्नोग्राफिक पाहणे टाळा

सोशल मिडियावर पोर्नोग्राफिक वेबसाईट (Pornographic website) शोधून त्यावर क्लिक करणे टाळा. कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे बघण्याचे  प्रमाण वाढत आहे . आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा.  तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळावे ,तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या  बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा . जर कोणत्याही पालकास असे निदर्शनास आले कि आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन फसवणूक किंवा ऑनलाईन रॅकेट मध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता. आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रारीची नोंद करा व त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण द्यावी असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचाः- शिवसेनेचे मंत्री फाईल अडवून ठेवतात, काँग्रेस आमदाराची नाराजी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा