Advertisement

शिवसेनेचे मंत्री फाईल अडवून ठेवतात, काँग्रेस आमदाराची नाराजी

शिवसेनेचे मंत्री काँग्रेस आमदारांच्या महत्त्वपूर्ण कामांच्या फाईल अडवून धरतात. त्यांचा मानसन्मान ठेवत नाहीत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या आमदाराने उघडपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमाेर केला.

शिवसेनेचे मंत्री फाईल अडवून ठेवतात, काँग्रेस आमदाराची नाराजी
SHARES

शिवसेनेचे मंत्री काँग्रेस आमदारांच्या महत्त्वपूर्ण कामांच्या फाईल अडवून धरतात. त्यांचा मानसन्मान ठेवत नाहीत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या आमदाराने उघडपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमाेर केला. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील दुजाभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. (shiv sena minister not approved our files says congress mla subhash dhote

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवार १९ जुलै रोजी विदर्भातील महाविकास आघाडीसोबतच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे इ. मंत्री उपस्थित होते. या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा झाली.

हेही वाचा - ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

यावेळी झालेल्या चर्चेत राजुराचे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे म्हणाले, तत्कालीन युती सरकारने नगरपालिकेला मिळालेला निधी बांधकाम विभागाकडे वर्ग केला होता. हा निधी पुन्हा नगरपालिकेकडे वळता करावा, यासाठी फेब्रुवारी महिन्यात नगरविकास मंत्री शिंदे यांना दोन पत्रं पाठवण्यात आली होती. नगरविकास खात्याच्या तत्कालीन सचिव मनिषा म्हैसकर यांच्याकडे देखील या कामासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. तरीही अद्याप हे काम अद्याप झालेलं नाही. निधी वळता करण्याचं काम तात्काळ करावं, अशी आमची मागणी आहे. 

काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील एक घटक पक्ष आहे. तरीही काँग्रेसच्या आमदारांची कामे होत नाहीत. त्यांना मानसन्मान दिला जात नाही, ही अतिशय चुकीची बाब आहे, अशा शब्दांत आमदार सुभाष धोटे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी उघड नाराजी बोलून दाखविली. एवढंच नाही, तर या बैठकीचा व्हिडिओ देखील धोटे यांनी सार्वजनिक केल्याने ही नाराजी सर्वांसमोर आली. आमदार धोटे यांच्या नाराजीची तात्काळ दखल घेऊन हे काम करण्याचं आश्वासन यावेळी शिंदे यांनी स्वत: दिलं.  

हेही वाचा - लोकल सेवा सुरू करण्याची मागणी योग्यच, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा